जाचक अटी रद्दसाठी शिक्षक सेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 07:36 PM2017-10-29T19:36:57+5:302017-10-29T19:38:30+5:30
अकोला : शासनाने २३ ऑक्टोबर २0१७ रोजी काढलेल्या निर्णयातील अन्यायकारक जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाने २३ ऑक्टोबर २0१७ रोजी काढलेल्या निर्णयातील अन्यायकारक जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्रा थमिक व माध्यमिक शिक्षक यांना मंजूर करावयाच्या चट्टो पाध्याय व निवडश्रेणीबाबत शाळा प्रगत ‘अ’ ग्रेड व शाळा सिद्धी उपक्रमात ‘अ’ ग्रेड असेल, तसेच नववी, दहावीचा निकाल संपूर्ण निकाल ८0 टक्क्यांच्यावर असणार्या शाळेतील शिक्षकांनाच ती वेतनश्रेणी लागू करण्याचा तुघलकी निर्णय घे तला. शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी २४ आ क्टोबर रोजी त्याबाबत शासनाला निवेदन दिले. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक सेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख मुकेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे यांच्या नेतृ त्वात शुक्रवारी निषेध आंदोलन केले. यावेळी विदर्भ सचिव गजानन खोबरखेडे, प्रमोद मोकळकर, सुरेश कडू, संतोष टाले, गणेश आढे, विजय भांडे, दिलीप खांदे, प्रवीण पेटे, गजानन ठाकरे, सुरेश धनी, शाहिरा घावट, प्रशांत शिंदे, संजय एकीरे, वासुदेव चिपडे, श्रीकृष्ण पिंपळकर, शिवदास आढे, रवींद्र अडागळे, गणेश उज्जैनकर, श्रावण इंगळे, नितीन उकर्डे, अजय टाले, राजेश मेश्राम, अजय शितोडे, गजानन ढाले, प्रा.विवेक गावंडेसह पदाधिकारी उपस्थित होते.