शिक्षकांच्या निवडश्रेणी प्रस्तावांची होणार तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:54+5:302021-08-21T04:23:54+5:30

अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना निवडश्रेणी लागू करण्यासाठी सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांचे प्रस्ताव ...

Teachers' selection proposals to be scrutinized! | शिक्षकांच्या निवडश्रेणी प्रस्तावांची होणार तपासणी !

शिक्षकांच्या निवडश्रेणी प्रस्तावांची होणार तपासणी !

googlenewsNext

अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना निवडश्रेणी लागू करण्यासाठी सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची तपासणी करण्याची प्रक्रिया लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांपैकी सेवेची २४ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यात येते. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना गत १३ वर्षांपासून वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर सातही पंचायत समित्यांकडून शिक्षकांच्या निवड श्रेणीचे प्रस्ताव गत आठवड्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून, प्राप्त झालेल्या प्रस्तावांची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. प्रस्तावांच्या तपासणीत पात्र ठरणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राथमिक शिक्षकांच्या निवड श्रेणीचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची तपासणी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. प्रस्तावांच्या तपासणीनंतर पात्र शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्यात येणार आहे.

दिलीप तायडे

उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद.

Web Title: Teachers' selection proposals to be scrutinized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.