अंधश्रद्धा, रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा -सत्यपाल महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:23 AM2021-09-24T04:23:21+5:302021-09-24T04:23:21+5:30

जागर फाउंडेशनद्वारा आयोजित आदर्श समाज निर्माण करणाऱ्या शिक्षकांना जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभात सत्यपाल महाराज बोलत होते. अकोला ...

Teachers should take initiative to destroy superstitions, norms and traditions - Satyapal Maharaj | अंधश्रद्धा, रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा -सत्यपाल महाराज

अंधश्रद्धा, रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा -सत्यपाल महाराज

googlenewsNext

जागर फाउंडेशनद्वारा आयोजित आदर्श समाज निर्माण करणाऱ्या शिक्षकांना जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभात सत्यपाल महाराज बोलत होते. अकोला जिल्ह्यातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्था बळकट करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना तेल्हारा येथे अनंतराव भागवत मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक किशोर भागवत होते. व्याख्याते आमदार अमोल मिटकरी, ज्येष्ठ लेखिका प्रतिमा इंगोले, पत्रकार विशालराजे बोरे, किशोर बळी, गोपाल भुजबले, यांची विशेष उपस्थिती होती, तर प्रमुख अतिथी म्हणून मनोहर शेळके, दीपक दही, राजेश वानखडे, सुभाष ढोकणे, शंकर तायडे, असलम खान पठाण, प्रमोद पोके, अमोल ढोकणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागर फाउंडेशनचे संयोजक उमेश तिडके यांनी केले, तर आभार गोपाल मोहे यांनी मानले. शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर चिपडे, तुलसीदास खिरोडकार दीपक पोके, निखिल गिऱ्हे, प्रवीण चिंचोळकर, राजेंद्र दिवनाले, प्रफुल्ल चिमणकार, अजय पाटील, शीला टेंभरे, सुरेखा हागे यांनी पुढाकार घेतला.

फोटो:

जागर फाउंडेशनच्या वतीने शिक्षकांचा गौरव

अकोला जिल्ह्यातील अरुण निमकर्डे, सोहन दामधर, साधना भोपळे, संघदास वानखडे, वंदना सोळंके, विश्वेश्वर पातुर्डे, मनोज पिंगळे, राजाराम म्हैसने, पौर्णिमा शर्मा, विजया खंडारे, नयना कळंबे, अपर्णा इंगळे, सविता देशमुख, पवन ठाकूर, अमोल राखोंडे, प्रफुल्ल वसो, निखिल गिऱ्हे, नाजिमोद्दीन नासिरोद्दीन, हमीद हुसेन लियाकत हुसेन, कपिल इंगळे, अमर भागवत, वजाहत अलीम आदी उपक्रमशील शिक्षकांचा जागर शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मान्यवरांचे पुष्पहाराऐवजी पुस्तकांनी स्वागत

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वागतासाठी फुलांचा वापर न करता पुस्तकांचा वापर करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थिनी समीक्षा माकोडे हिने ‘हम को मन की शक्ती देना’ हे प्रेरणा गीत सादर केले. तिच्या गोड आवाजाबद्दल सत्यपाल महाराज यांच्या हस्ते शाल व तीन हजार रुपये रोख बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.

Web Title: Teachers should take initiative to destroy superstitions, norms and traditions - Satyapal Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.