शिक्षकांनी प्रबाेधनाची वाट अंगीकारावी - सत्यपाल महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:19 AM2021-09-25T04:19:08+5:302021-09-25T04:19:08+5:30
जागर फाउंडेशनतर्फे आयोजित जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभात सत्यपाल महाराज बोलत होते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण ...
जागर फाउंडेशनतर्फे आयोजित जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभात सत्यपाल महाराज बोलत होते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्था बळकट करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना या वेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक किशोर भागवत होते. या वेळी व्याख्याते आमदार अमोल मिटकरी, ज्येष्ठ लेखिका प्रतिमा इंगोले, पत्रकार विशालराजे बोरे, गोपाल भुजबले, मनोहर शेळके, दीपक दही, राजेश वानखडे, सुभाष ढोकणे, शंकर तायडे, असलम खान पठाण, प्रमोद पोके, अमोल ढोकणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जागर’चे संयोजक उमेश तिडके यांनी केले, तर आभार गोपाल मोहे यांनी मानले. उपक्रमासाठी नंदकिशोर चिपडे, तुलसीदास खिरोडकार दीपक पोके, निखिल गिऱ्हे, प्रवीण चिंचोळकर, राजेंद्र दिवनाले, प्रफुल्ल चिमणकार, अजय पाटील, शीला टेंभरे, सुरेखा हागे यांनी पुढाकार घेतला.
फोटो:
उपक्रमशील शिक्षकांचा गाैरव
अरुण निमकर्डे, सोहन दामधर, साधना भोपळे, संघदास वानखडे, वंदना सोळंके, विश्वेश्वर पातुर्डे, मनोज पिंगळे, राजाराम म्हैसने, पौर्णिमा शर्मा, विजया खंडारे, नयना कळंबे, अपर्णा इंगळे, सविता देशमुख, पवन ठाकूर, अमोल राखोंडे, प्रफुल्ल वसो, निखिल गिऱ्हे, नाजिमोद्दीन नासिरोद्दीन, हमीद हुसेन लियाकत हुसेन, कपिल इंगळे, अमर भागवत, वजाहत अलीम आदी उपक्रमशील शिक्षकांचा जागर गाैरव करण्यात आला.
दिव्यांग विद्यार्थिनी समीक्षाचा सत्कार
दिव्यांग विद्यार्थिनी समीक्षा माकोडे हिने ‘हम को मन की शक्ती देना’ हे प्रेरणा गीत सादर केले. तिच्या गोड आवाजाबद्दल सत्यपाल महाराज यांच्या हस्ते शाल व तीन हजार रुपये रोख बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वागतासाठी फुलांचा वापर न करता पुस्तकांचा वापर करण्यात आला.