शिक्षकाची आत्महत्या; शाळेतच प्राशन केले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:02 PM2019-02-12T14:02:35+5:302019-02-12T14:02:45+5:30
तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेतच विष प्राशन केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेतच विष प्राशन केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या शिक्षकाला तातडीने तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन नारायण इंगळे रा. बेलखेड असे मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक गजानन इंगळे हे ११ फेब्रुवारी रोजी विद्यालयात आले होते. तेथून एका दुकानातून त्यांनी दोन लिफाफे विकत घेतले. त्यामध्ये कागदपत्रे टाकून ते तळेगाव येथील पोस्टात टाकले. त्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रयोगशाळेत विषारी द्रव्य प्राशन केले, अशी माहिती मिळाली. हा प्रकार शाळेतील इतर शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी इंगळे यांना तातडीने तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांच्याजवळ काहीही आढळून आले नाही. मृतक गजानन इंगळे यांची मुलगी पुणे येथे असल्यायने ती आल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याबाबत मुख्याध्यापक गिºहे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला याविषयी माहिती दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याध्यापकाबरोबर सुरू होता वाद
मृतक शिक्षक गजानन इंगळे व मुख्याध्यापक अरविंद गिºहे यांचा काही दिवसांपासून वाद झाला होता. या दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. त्यामुळे मृतक गजानन इंगळे यांनी मुख्याध्यापक ाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या बाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली नव्हती. दरम्यान, या विषयावर मुख्याध्यापक अरविंद गिºहे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
फोटो आहे