महिला सभापतींच्या पतीविरुद्ध शिक्षक संघटना एकवटल्या!
By admin | Published: April 13, 2017 01:59 AM2017-04-13T01:59:03+5:302017-04-13T01:59:03+5:30
अकोट : अकोट पंचायत समितीमध्ये महिला सभापती आहेत; परंतु त्यांचे पतीच सर्व कारभार पाहत असल्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटत आहे.
सभापतींचे पती हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप
अकोट : अकोट पंचायत समितीमध्ये महिला सभापती आहेत; परंतु त्यांचे पतीच सर्व कारभार पाहत असल्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटत आहे. या पतीराजांच्या हस्तक्षेपाविरुद्ध सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या पतीराजांबद्दल शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे निवेदन दिले असून, न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी सभापतींनी शिक्षकांबाबत केलेली तक्रार गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केली आहे.
अकोट पंचायत समितीमध्ये सभापतीपदी आशा राजेंद्र एखे विराजमान आहेत. मात्र त्यांचे पती राजेंद्र एखे व इतर मंडळी कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मत आहे. सभापतींनी व त्यांच्या पतींनी पणज, रुईखेड केंद्रांतर्गत शाळांना दिलेल्या भेटीत तालुक्यातील ११ शाळा बंद आढळल्याने त्या शाळांवरील शिक्षकांवर एक दिवसाची विनावेतन कारवाई करण्याचे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
या पत्रानंतर तालुक्यातील अकोट तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, साने गुरुजी शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक संघटना यांनी एकत्र येऊन आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकाऱ्यांना सभापतीच्या पतीविरोधात निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. या निवेदनामध्ये सभापतीसोबतच त्यांचे पती व इतर मंडळी शालेय कामकाजात हस्तक्षेप करतात. पणज व रुईखेड केंद्रांतर्गत काही शाळांना सभापती व त्यांच्या पतीने भेटी दिल्या. यावेळी सभापतींच्या पतीने शिक्षक हजेरीचे फोटो काढणे, शिक्षकांना अध्यापनासंबंधी प्रश्न विचारणे, शिक्षकांचे अर्ज सोबत नेणे आणि नंतर ज्यांचे अर्ज घेतले, त्याच शाळेला शाळा बंदची नोटिस देणे, शिक्षक हजर असताना शाळा बंद दाखविणे अशी कामे केली आहेत, असा आरोप करी धरणे मंडपात प्रा. ह. रा. हिवरे, सुनील मोडक, अॅड. संतोष भोरे, दादासाहेब वाकोडे, विजय मोडक, बी. एस. इंगळे, श्रीकांत कुकडे, संजय चिंचोळकर, बबनराव कानकिरड, विजय गावंडे, बाबाराव मोडक, दयाराम काळणे, सतीश भांबेरे, मुरलीधर बोरकर, म. मुजम्मिल गु. आ. पांडे, भाऊराव देशमुख, सुखदेवराव मोडक,अॅड. रामसिंह राजपूत, प्रशांत मोडक, श्रीधर इंगळे, प्रल्हाद भारती, मनोहरराव मार्के, पंजाबराव मोडक, निरंजन मोडक, अरुण जाधव, सहदेवराव मोडक, उल्हास मोडक आदींची उपस्थिती होती.