दिवाळी सुट्या कमी दिल्याने शिक्षक संघटना नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:40 PM2019-10-16T13:40:55+5:302019-10-16T13:41:15+5:30

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांची सुटी दिली आहे.

Teachers' union annoyed over shortening Diwali holidays! | दिवाळी सुट्या कमी दिल्याने शिक्षक संघटना नाराज!

दिवाळी सुट्या कमी दिल्याने शिक्षक संघटना नाराज!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने यंदा दिवाळीला केवळ दहा दिवसांची सुटी जाहीर केली आहे; परंतु राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांची सुटी दिली आहे. शिक्षण विभागाने कमी सुट्या दिल्यामुळे शिक्षक संघटना नाराज झाल्या असून, संघटनांनी ७ नोव्हेंबरपर्यंत सुट्या वाढविण्याची मागणी मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन २५ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान अशी दहा दिवसांची दिवाळीची सुटी जाहीर केली आहे; परंतु शिक्षक संघटनांनी शिक्षक, मुख्याध्यापक निवडणूक कामात व्यस्त आहेत. २४ आॅक्टोबरनंतर शिक्षक, मुख्याध्यापक निवडणूक कामातून मुक्त होणार आहेत.
विद्यार्थी, शिक्षकांचा विचार करता दिवाळी सुट्या वाढविण्याची मागणी शिक्षण समन्वय समितीने केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षकांना २४ आॅक्टोबर ते १0 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी जाहीर केली असताना, अकोला जिल्ह्यातील शिक्षकांना केवळ दहा दिवसांची सुटी देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या हिताचा विचार करून ७ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी देण्याची मागणी केली आहे.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात शिक्षण समन्वय समितीचे सचिव डॉ. अविनाश बोर्डे, विजय ठोकळ, प्रा. नरेंद्र लखाडे, प्रदीप थोरात, शशांक मोहोड, संतोष अकोटकर, प्रा. पंकज वाकोडे, रामेश्वर धर्मे, श्रीकांत दांदळे, पंकज अग्रवाल, दि. जा. गायकवाड, प्रा. शेख हसन कामनवाले, गजानन चौधरी, फैयाज खान, आशिष दांदळे व गोकूळ गावंडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
 

Web Title: Teachers' union annoyed over shortening Diwali holidays!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.