बार्शीटाकळी तालुक्यातील शिक्षकांना इंग्रजी, गणित व भाषेचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:23 PM2018-12-04T12:23:58+5:302018-12-04T12:24:53+5:30
अकोला: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व एएलपी कार्यक्रमांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील १५ शाळांमधील शिक्षकांना गणित, भाषा, विज्ञान, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषय शिकविताना ज्ञानरचनावादाचा वापर आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्याबाबत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले
अकोला: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व एएलपी कार्यक्रमांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील १५ शाळांमधील शिक्षकांना गणित, भाषा, विज्ञान, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषय शिकविताना ज्ञानरचनावादाचा वापर आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्याबाबत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य गजेंद्र काळे यांनी धाबेकर महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाएटचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, केंद्र प्रमुख शंकरराव जंजाळ, सागर तुपे, जितेंद काठोळे, प्रेरणा मोरे आदी उपस्थित होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांनी ज्ञानरचनावाद, मनोरंजनातून आणि खेळांच्या माध्यमातून गणित, भाषा, विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे विद्यार्थ्यांना कसे शिक्षण द्यावे आणि त्यांचा अध्ययनस्तर वाढविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, या पद्धतीने तज्ज्ञ जितेंद्र काठोळे, विजय पजई, तृप्ती देशपांडे, प्रेरणा मोरे, नीता जाधव, प्रवीण मोहोड, भीमसिंग राठोड यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य गजेंद्र काळे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनीसुद्धा शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक संजय अग्रवाल, पर्यवेक्षक विलास ताठे, सुबूर खान, प्राचार्य सुभाष वाघ, प्राचार्य मधुकर चव्हाण, प्राचार्य रेश्मा शेख उपस्थित होते. प्रशिक्षणाला तालुक्यातील १८0 शिक्षक उपस्थित होते. संचालन सुनील कडू यांनी केले. (प्रतिनिधी)