शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:03 PM2019-01-18T16:03:00+5:302019-01-18T16:03:04+5:30

अकोला - शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा प्रचंड हैदोस सुरू असून, याकडे दामिनी पथक व संबंधित पोलीस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

teasing gangs at the school-college campus | शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा हैदोस

शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा हैदोस

Next

अकोला - शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा प्रचंड हैदोस सुरू असून, याकडे दामिनी पथक व संबंधित पोलीस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. टवाळखोरांनी शाळेतील विद्यार्थिनींना शाळेत जाऊन मारहाण केल्याची घटना भारत विद्यालयात घडल्याने पोलिसांचा धाक उरला नसल्याचे वास्तव आहे.
शहरातील शाळा व महाविद्यालयांसमोर टवाळखोर युवकांच्या टोळ्याच दिवसभर ठाण मांडून असतात. व्हाईटनर तसेच विविध द्रव्यांची नशा करून येणाऱ्या-जाणाºया मुलींची छेडखानी करणे, त्यांना उद्देशून बोलणे अशा प्रकारच्या छेडखानीसह विद्यार्थिनींचा पाठलाग करण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू आहेत; मात्र दामिनी पथक केवळ शहराबाहेरच्या ठिकाणांवर फेºया मारीत असून, या पथकाने शाळा व महाविद्यालयासमोरील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी विद्यार्थिनींकडून करण्यात येत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या युवकांची व टवाळखोरांची दादागिरी वाढत असून, पोलिसांनाही खिशात घेऊन असल्याची बतावणी थेट विद्यार्थिनींना करतात, त्यामुळे या टवाळखोरांचा हैदोस प्रचंड वाढला असताना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. पोलीस अधीक्षक व ठाणेदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दुचाकींवर फटाके फोडणारे, वेगात दुचाकी चालविणाºया या टवाळखोर युवकांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
 
महाविद्यालयांमध्ये युवकांच्या टोळ्यांमुळे विद्यार्थी असुरक्षित
शहरातील बहुतांश महाविद्यालयातील विद्यार्थिनी असुरक्षित आहेत. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्यांच्या पुढे-पुढे करणाºया काही विद्यार्थ्यांनी महधत्त्वाची पदे ताब्यात घेऊन येथील विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करण्याचे प्रताप केले आहेत. यामधील दोन विद्यार्थिनी पोलीस तक्रारीसाठी पुढे आल्या; मात्र ठाण्यात येण्यापूर्वीच आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळल्याने या टोळीतील युवकांचे चांगलेच फावले आहे. स्वत:ला वक्ते व प्रवक्ते म्हणून घेणाºया विद्यार्थ्यांनी येथील विद्यार्थिनींचा चांगलाच छळ सुरू केला आहे; मात्र प्राचार्यांच्या खास मर्जीतील हे विद्यार्थी असल्याने विद्यार्थिनीही तक्रार करण्याची भीती बाळगत असल्याची माहिती येथील विद्यार्थिनींनीच दिली.

 

Web Title: teasing gangs at the school-college campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.