मुलीची काढली छेड; आईने विरोध करताच केला हल्ला
By आशीष गावंडे | Updated: June 1, 2024 23:56 IST2024-06-01T23:56:29+5:302024-06-01T23:56:51+5:30
मुलगी जखमी; सराफ बाजारातील घटना सीसीटीव्ही कैद.

मुलीची काढली छेड; आईने विरोध करताच केला हल्ला
अकाेला:शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफ गल्लीत शनिवारी भरदिवसा दोन अज्ञात युवकांनी एका मुलीची छेड काढली. या युवकांना विराेध करणाऱ्या तीच्या आइला युवकांनी रस्त्यावर मारहाण सुरु केली. आइच्या बचावासाठी आलेल्या मुलीच्या पाेटात तिक्ष्ण हत्याराने वार करताच मुलगी जखमी हाेऊन रस्त्यावर काेसळली. दरम्यान,ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्यामुळे काेतवाली पाेलिस दाेन्ही युवकांचा छडा लावतील का, याकडे लक्ष लागले आहे.
सराफ बाजारातील नाल्यांमध्ये साेन्याचा धातू शाेधणाऱ्या मायलेकींवर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. सराफ गल्लीतून मायलेकी जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली. या प्रकाराला मुलीच्या आइने विरोध केला असता युवकाने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून समाेर गेलेली मुलगी मदतीसाठी धावली. या झटापटीत युवकाने त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याराने मुलीच्या पाेटात वार केला. वार वर्मी बसल्यामुळे ही मुलगी लगेच जमिनीवर कोसळली. यावेळी तीच्या आइने मारहाण करणाऱ्या त्या युवकांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. जखमी मुलीला सर्वाेपचारमध्ये भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात आली आहे.
चिडीमार,लुटमारांचा बंदाेबस्त कधी?
काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत शहरातील प्रमुख बाजारपेठ वसली आहे. गांधी चाैक, जुना धान्य बाजार, काेठडी बाजार,सराफ बाजार, काला चबुतरा परिसरातील बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या महिला व तरुणींची स्थानिक युवकांकडून नेहमीच छेड काढली जाते. तसेच पाकिटमार व साेने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या साेन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्यांचाही बाेलबाला राहताे. अशा चिडीमार व लुटमार करणाऱ्यांना सिटी काेतवाली पाेलिस कधी गजाआड करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
...तर अदखलपात्र गुन्हा कसा?
सराफ बाजारात महिला व तीच्या मुलीला मारहाण करीत असल्याची घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. एखाद्या किरकाेळ परंतु मलइदार प्रकरणात पाेलिस भादंवि कलम ३०७चा वापर करतात. परंतु याठिकाणी मुलीच्या पाेटात तिक्ष्ण हत्याराने वार केल्यानंतरही सिटी काेतवाली पाेलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद केली आहे. या प्रकाराकडे जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह, शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी लक्ष देतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.