भूमिगत गटार याेजनेच्या २ हजार ४८ काेटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी; मजीप्राने दिली मंजूरात

By आशीष गावंडे | Published: August 2, 2023 03:49 PM2023-08-02T15:49:25+5:302023-08-02T15:49:45+5:30

प्रस्ताव सुकाणू समितीकडे

Technical approval for the proposal of 2 thousand 48 crores of underground sewerage scheme | भूमिगत गटार याेजनेच्या २ हजार ४८ काेटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी; मजीप्राने दिली मंजूरात

भूमिगत गटार याेजनेच्या २ हजार ४८ काेटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी; मजीप्राने दिली मंजूरात

googlenewsNext

अकाेला: भूमिगत गटार याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेने २ हजार ४८ काेटी ६० लक्ष रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सादर केला असता, या प्रस्तावाला मजिप्राने तांत्रिक मंजूरी दिली आहे. पुढील मंजूरीसाठी हा प्रस्ताव शासनाच्या सुकाणू समितीकडे सादर केला जाणार आहे. 

‘अमृत अभियान’च्या पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार याेजनेंतर्गत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शिलाेडा येथे ३० एमएलडी प्लान्ट उभारण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला प्राप्त झालेल्या ८७ काेटींच्या निधीतून प्रशासनाने माेर्णा नदीपात्रातून शिलाेडा पर्यंत मलजलवाहिनीचे जाळे अंथरले. या वाहिनीद्वारे शिलाेडा येथे उभारण्यात आलेल्या ३० एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेन्ट प्लान्टमध्ये पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. तसेच सात एमएलडीचा प्लान्ट डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आला.

यादरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील याेजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रशासनाने नागपूर येथील एजन्सीची नियुक्ती केली. एजन्सीने प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर मनपाने सुधारित प्रस्ताव तयार करुन तांत्रिक मंजूरीसाठी मजीप्राकडे सादर केला हाेता. तब्बल २ हजार ४८ काेटी ६० लक्षच्या प्रस्तावाला मजिप्राने तांत्रिक मंजूरी प्रदान केली आहे. यामध्ये मलजल वाहिनीचे जाळे अंथरणे, पंम्पिंग मशीनद्वारे सांडपाण्याचा उपसा करणे, ताेडफाेड झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासह विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत. 

‘एसटीपी’साठी १२४ काेटींचा खर्च
दुसऱ्या टप्प्यातील याेजनेसाठी ७१ एमएलडीचा मलनिस्सारण प्रकल्प (सीवरेज ट्रीटमेन्ट प्लान्ट)उभारल्या जाणार आहे. याकरीता मनपाने शिलाेडा भागात सुमारे २२ एकर इ क्लास जमिनीची निवड केली आहे. ‘एसटीपी’साठी १२४ काेटींचा खर्च अपेक्षित आहे. 

मलजल वाहिनीसाठी ८०० काेटींची तरतूद
‘भूमिगत’च्या दुसऱ्या टप्प्यात हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील लहान माेठ्या नाल्या एकमेकांना जाेडल्या जातील. अर्थात, नव्याने अंथरल्या जाणाऱ्या मलजल वाहिनीचे अंतर तब्बल ८ लाख ३३ हजार ५४० मिटर असल्याची माहिती आहे. या कामावर ८०० काेटी ५१ लक्ष ४७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मालमत्तांना जाेडण्यासाठी ६४५ काेटींचा खर्च
भूमिगत गटार याेजनेसाठी प्रति माणसी १०० लिटर सांडपाण्याची माेजदाद गृहित धरण्यात येते. तरच मलजल वाहिनीद्वारे सांडपाणी प्रवाहित हाेऊ शकते. शहरातील १ लाख ३७ हजार ७६६ रहिवासी मालमत्तांमधील सांडपाणी मलजल वाहिनीला जाेडण्यासाठी ६४५ काेटी ९४ लाख रुपयांतून नवीन कनेक्शन दिले जातील.

Web Title: Technical approval for the proposal of 2 thousand 48 crores of underground sewerage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला