अवैध रेती माफियांवर तहसीलदारांची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:48+5:302021-02-05T06:12:48+5:30
रेती माफिया अवैधरीत्या रेतीची वाहतूक करून लाखो रुपयांचा महसूल बुडवित आहेत. कितीही कारवाई केली तरी रेती माफिया या कारवाईला ...
रेती माफिया अवैधरीत्या रेतीची वाहतूक करून लाखो रुपयांचा महसूल बुडवित आहेत. कितीही कारवाई केली तरी रेती माफिया या कारवाईला न जुमानता लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत. अखेर तहसीलदार राजेश गुरव यांनीं नेर येथे एमएच ३० बीडी ९९२८ व वांगरगाव येथे एमएच ३० एबी १०४९ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीतून रेतीची अवैध वाहतूक करीत असताना आढळून आले. या दोन वाहनांवर कारवाई करून दोन्ही वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले. वांगरगाव येथे १२ ब्रास रेतीचा साठा आढळून आल्याने, सदर रेती साठा जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार राजेश गुरव, तलाठी वाकपांजर, वाहनचालक तायडे यांनी केली.