मूर्तिजापुरात तहसीलदारांनी २ दुकाने केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:47+5:302021-02-24T04:20:47+5:30

मूर्तिजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या ७ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी तहसीलदार प्रदीप पवार यांनी येथील ...

Tehsildar seals 2 shops in Murtijapur | मूर्तिजापुरात तहसीलदारांनी २ दुकाने केली सील

मूर्तिजापुरात तहसीलदारांनी २ दुकाने केली सील

Next

मूर्तिजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या ७ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी तहसीलदार प्रदीप पवार यांनी येथील दोन झेरॉक्स दुकानाला सील ठोकले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये मूर्तिजापूर पालिका हद्दीत सामाजिक अंतर व अन्य उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ७ दिवसांचे लाॅकडाऊन करण्यात आले. परंतु तहसील कार्यालय परिसरातील नेमाडे व सिंहे या दोघांच्या झेरॉक्स सेंटरमध्ये सामाजिक अंतर व अन्य उपाययोजनांची पायमल्ली होत असल्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांच्या निदर्शनास आले. त्यानी लगेच या दोन सेंटरविरुद्ध कारवाई करून सील केले.

-----काेट-------

कोविड-१९ चा फैलाव होऊ नये म्हणून वेळोवेळी निर्गमित आदेशांचे उल्लघन होणार नाही, याबाबत दुकाने, हॉटेल्स व खासगी आस्थापनांनी दक्षता घ्यावी.

-प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर.

Web Title: Tehsildar seals 2 shops in Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.