वाळू माफियाविरुद्ध तहसीलदारांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:35+5:302021-03-19T04:17:35+5:30
पांढुर्णा : पातूर तालुक्यात दिवसेंदिवस वाळू माफियांचे स्तोम वाढत आहे. तालुक्यातील १८ रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे महसूल ...
पांढुर्णा : पातूर तालुक्यात दिवसेंदिवस वाळू माफियांचे स्तोम वाढत आहे. तालुक्यातील १८ रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे महसूल अधिकारी गस्तीवर असतानाही वाळू माफिया महसूल अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन वाळूची चोरी करत आहेत. तहसीलदार दीपक बाजड यांनी साध्या वेशात अधिकाऱ्यांसोबत परिसरामध्ये जात वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे.
पिंपळडोळी येथे रेतीची वाहतूक करताना त्यांनी एक ट्रॅक्टर व ट्रॉली पकडली. ट्रॅक्टर अडवून त्यांनी ट्रॅक्टर मालकाला १ लाख १५ हजार ८३३ रुपयाचा दंड ठोठावला आहे. हा ट्रॅक्टर रेतीसह तहसीलदार दीपक बाजड यांनी स्वतः चान्नी पोलीस स्थानकात जमा केला आहे. ही कारवाई मंडल अधिकारी विजयसिंह राठोड, तलाठी अमित सबनीस यांनी केली. परिसरात अवैध रेती उत्खननाला ऊत आला आहे. रेती चोरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे.