तेल्हारा बाजार समितीचे लाचखाेर सभापती, उपसभापती गजाआड; एक लाख रुपये घेताना रंगेहाथ
By सचिन राऊत | Published: September 25, 2023 07:22 PM2023-09-25T19:22:39+5:302023-09-25T19:22:59+5:30
एक लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक, अकाेला एसीबीची माेठी कारवाई
अकाेला : तेल्हार कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये शासनाच्या आधारभुत कींमत याेजनेतंर्गत नाफेड खरीप व रब्बी हंगामात हरभरा खरेदीसाठी तक्रारदार यांनी हमालांचा पुरवठा केल्यानंतर त्याचे १४ लाख ३९ हजार ५९२ रुपयांचे देयक काढण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तेल्हारा एपीएमसीच्या सभापती, उपसभापती या दाेघांना साेमवारी रंगेहाथ अटक करण्यात आली़
अकाेला लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने ही माेठी कारवाई केली असून यामूळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समीती येथे नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी एका कंत्राटदाराने हमालांचा पुरवठा केला हाेता़ या पुरवठयाचे कामकाज पुर्ण झाल्यानंतर त्यांनी १४ लाख ३९ हजार ५९२ रुपयांचे देयक सचिव सुरेश साेनाेने यांच्याकडे सादर केले़ त्यानंतर काही दिवसांनी कंत्राटदाराचे ४ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम धनादेश व राेख स्वरुपात अदा करण्यात आली़ मात्र ९ लाख ४६ हजार ५९२ रुपयांच्या देयकाची रक्कम थकीत असल्याने त्यांनी पुन्हा अर्ज करून मागणी केली असता सभापती सुनील माेतीराम इंगळे वय ४९ वर्ष, उपसभापती प्रदीप मधुकर ढाेले वय ६२ वर्ष व सचिव सुरेश साेनाेने या तीघांनी हमालांचा पुरवठार करणाऱ्या तक्रारदारास बाजार समीतीत बाेलावून एक लाख रुपयांची मागणी केली़ मात्र त्यांना लाच देणे नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार अकाेला एसीबीकडे केली़
यावरुन लाचलुचपत प्रतीबंधक विभागाचे प्रमूख उपअधीक्षक शैलेष सपकाळ व पथकाने २१ सप्टेंबर राेजी पडताळणी केली असता उपसभापती ढाेलेने लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले तर सभापती इंगळे याने त्यास प्राेत्साहन दिल्याचेही एसीबीच्या पडताळणीत समाेर आले़ त्यानंतर २५ सप्टेंबर राेजी तेल्हारा बाजार समीतीत उपसभापती ढाेलेने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताच सभापती सुनील इंगळे व उपसभापती प्रदीप ढाेले या दाेघांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतीबंधक कायद्यान्वये तेल्हारा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाइ पाेलिस अधीक्षक मारूती जगताप, अपर पाेलिस अधीक्षक देवीदास घेवारे, अकाेला एसीबीचे प्रमूख शैलेष सपकाळ, पाेलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार व पथकाने केली़