तेल्हारा बीईओंची चाौकशी थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:45+5:302020-12-08T04:15:45+5:30

अकोला : जि.प. शाळेचे १२ विद्यार्थी खासगी शाळांच्या पोर्टलवर हस्तांतरित केल्याप्रकरणात तेल्हारा गटशिक्षणाधिकारी यांची चाैकशी सुरू करण्याचे आदेश दिले ...

Telhara BEO's inquiries in a cold settlement | तेल्हारा बीईओंची चाौकशी थंड बस्त्यात

तेल्हारा बीईओंची चाौकशी थंड बस्त्यात

Next

अकोला : जि.प. शाळेचे १२ विद्यार्थी खासगी शाळांच्या पोर्टलवर हस्तांतरित केल्याप्रकरणात तेल्हारा गटशिक्षणाधिकारी यांची चाैकशी सुरू करण्याचे आदेश दिले हाेत, मात्र हे प्रकरण आता थंड बस्त्यात पडले आहे. जि.प. शिक्षण विभागाचे याकडे लक्ष नाही.

मृदा व्यवस्थापन जनजागृती

अकोला : कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, कोरो मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने मृदा आरोग्य व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डाॅ. उमेश ठाकरे, उदयकुमार नलावडे, डाॅ. विनोद खडसे, गजानन तुपकर, कुलदीप देशमुख आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मृदा परीक्षणाचे प्रशिक्षण दिले.

कुष्ठ व क्षयरोग तपासणी माेहीम

अकोला : कृष्ठरोग व क्षयरोग तपासणीसाठी मोहीम सुरू करण्यात आली असून, शनिवारी कंचनपूर येथे नागरिकांची तपासणी घेण्यात आली. यावेळी सरपंच सिद्धार्थ सिरसाट, शिवशंकर पाटील, आशा सिरसाट, विद्या चोरे, कार्तिक काकडे आदी उपस्थित होते. नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

पथदिवे बंद; मनपाचे दुर्लक्ष

अकोला : रामदास पेठ, अकोट फैल, जठारपेठ, लक्झरी बस स्टँड रोड, खदान काैलखेड या परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात तक्रारी देऊनही मनपाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.

आरडीजी स्कूलमध्ये मधुस्मृती

अकोला : आरडीजी स्कूलमध्ये स्व. मधुदेवी गोयनका यांच्या वाढदिवसानिमित्त मधुस्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्ग आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. यावेळी दिलीपराज गोयनका, हरमिंदरसिंग चटवाल आदी उपस्थित होते.

बांधकाम मजुरांना योजनेचा लाभ

अकाेला : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाद्वारे नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून योजनांचे अर्ज प्रलंबित होते, मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे लाभाचे वाटप होऊ शकले नाही. आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

निकिता हिवराळेच्या पालकांना मदत

अकोला : तळेगाव येथील निकिता हिवराळे आत्महत्या प्रकरणात जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या सहायता धनादेशाचे वितरण तिचे वडील सुरेश हिवराळे यांना करण्यात आले. हा निधी मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीने पाठपुरावा केला होता.

वार्ड क्र. ६ मध्ये घाणीचे साम्राज्य

अकोला : मनपा हद्दीतील वार्ड क्र. ६ देशमुख फैल येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून, येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरसेवकांना वारंवार तक्रारी करूनसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

एड‌्स निर्मूलन दिनानिमत्त कार्यक्रम

अकाेला : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण कार्यालयात न्या. वाय.जी. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव स्वरूप एस. बोस यांच्या वतीने एड‌्स निमूलन दिनानिमत्त कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रकला परीक्षेबाबत संभ्रम

अकोला : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्या वतीने चित्रकला ग्रेड परीक्षा घेतली जाते. यावर्षी कोरोनामुळे सहावी ते आठवीचे वर्ग बंद असल्यामुळे या परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत कला संचालनालय यांच्या वतीने कुठलेही निर्देश नाही.

Web Title: Telhara BEO's inquiries in a cold settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.