तेल्हारा तालुका कृषी विभागाकडे बोंडअळीग्रस्त १५00 शेतकर्‍यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 08:33 PM2017-12-08T20:33:48+5:302017-12-08T20:40:24+5:30

तेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

Telhara County Agriculture Department complaints about 1500 farmers affected by Bonded | तेल्हारा तालुका कृषी विभागाकडे बोंडअळीग्रस्त १५00 शेतकर्‍यांच्या तक्रारी

तेल्हारा तालुका कृषी विभागाकडे बोंडअळीग्रस्त १५00 शेतकर्‍यांच्या तक्रारी

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रारींचा ओघा सुरुचा; अर्ज देण्यासाठी लागल्या शेतकर्‍यांच्या रांगाकृषी विभागाचे अधिकारी करताहेत तक्रारकर्त्यांच्या शेतात जाऊन पंचनामे 

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
तेल्हारा तालुका हा विदर्भात कापूस पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यात जलसिंचन असल्याने यावर्षी २२ हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली. त्यात शेतकर्‍यांनी या पिकावर एकरी २0 ते २२ हजार रुपये खर्च केला व मे महिन्यात भरउन्हात पाणी देऊन कपाशी जगवली; मात्र काही महिन्यांपासून कपाशीवर गुलाबी बोंडअळी आल्याने एकरी १२ ते १५ क्विंटल होणारे उत्पादन केवळ २ ते ४ क्विंटल प्रतिएकर झाले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घटून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी बिटी बियाणे बोगस असल्याची तालुक्यातील १५00 शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारींचा ओघ मोठय़ा प्रमाणात चालू आहे. तक्रारी करणार्‍या शेतकर्‍यांच्या मोठय़ा रांगाच लागल्या आहेत. तक्रारी मिळाल्यानंतर कृषी विभाग शेतात जाऊन पंचनामे करीत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत ७00 शेतकर्‍यांचे पंचनामे केले आहेत. शासनाने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सर्व्हे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी होत आहे. उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने शेतकर्‍यांचे मनोबल पूर्ण खचले. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

Web Title: Telhara County Agriculture Department complaints about 1500 farmers affected by Bonded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.