शासनाचा अध्यादेश फाडून तेल्हारा वंचित आघाडीने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:03+5:302020-12-16T04:34:03+5:30
तालुक्यातील वान धरणाचे पाणी इतरत्र पळवू दिले जाणार नाही. तालुक्यातील जनतेला पिण्याचे व सिंचनासाठी पाणी कमतरता असताना हक्काचे पाणी ...
तालुक्यातील वान धरणाचे पाणी इतरत्र पळवू दिले जाणार नाही. तालुक्यातील जनतेला पिण्याचे व सिंचनासाठी पाणी कमतरता असताना हक्काचे पाणी पळविले जात आहे. शेतकऱ्यांनी यासाठी विरोध केला. तो योग्य असून, तालुका वंचित बहुजन आघाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोबत आहे. जिल्हा परिषदमध्येसुद्धा वान पाणी प्रश्न फेटाळला आहे. वंचित बहुजन आघाडीने अकोला अमृत योजना व बाळापूर ६९ खेडी पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने काढलेल्या अध्यादेशाला फाडून निषेध केला. यावेळी तेल्हारा वंचित आघाडीचे कार्यकर्ते विकास पवार, अशोक दारोकार, दीपमाला दामधर जि. प. सदस्य, अनंता अवचार जि. प. सदस्य, पद्मा गवारगुरू, कल्पना हिवराळे, अरविंद तिव्हाने, अनिल मोहोड पं.स. सदस्य, मधुसूदन बरिंगे, प्रल्हाद पाचपोर, लखन सोनटक्के, राजेश पोहरकार, गोपाल मंत्री, रोशन दारोकार, गोपाल जळमकार, सुदर्शन बोदडे, संदीप गावंडे, सत्यशील सावरकर, सिद्धेश्वर तिव्हाणे, सतीश मामनकार, नितीन पोहरकार, आकाश जसनपुरे, शिवहरी बाहे, पुरुषोत्तम मानकर, पवन पहुरकर, रतन गव्हांदे, सुधाकर भाकरे, सूरज वाघमारे, संदीप भोंडे, श्रीकृष्ण वैतकार, जय पोहरकार, गोपाल विरघट, यांच्यासह शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
फोटो: