तेल्हारा एक्स्प्रेस अर्चनाने जिंकले सुवर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:51 AM2017-09-30T00:51:55+5:302017-09-30T00:52:01+5:30
अकोला: तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या तेल्हारा एक्स्प्रेस म्हणून ओळख प्राप्त झालेल्या अर्चना अढाव हिने पुन्हा सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या ५७ व्या खुल्या राष्ट्रीय अँथलेटिक्स स्पर्धेत १५00 मीटर शर्यतीत अर्चनाने सुवर्ण पदक मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क

अर्चनाने तिच्या आवडत्या ८00 मीटर शर्यतीतून माघार घेत १५00 मीटर शर्यतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धा पात्रता गाठण्याच्या उद्देशाने घेतल्याचे कळते. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत घडलेली व सध्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी अर्चनाने ४ मिनिटे १८.६४ सेकंदात पूर्ण केले. याच सोबत स्पर्धेत महाराष्ट्राला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. मागे भुवनेश्वर येथे झालेल्या अँथलेटिक्स स्पर्धेत अर्चनावर दुसर्या धावपटूला अडथळा निर्माण केल्याचा आरोप झाला. औटघटकेचे सुवर्ण पदक अर्चनाने मिळविले हो ते. सुवर्ण पदक जिंकल्याचा हा आनंद काही क्षणांसाठीच होता.
दानापूर येथे १४ जुलै १९९५ रोजी अर्चनाचा जन्म झाला. परिस् िथती अत्यंत बिकट. त्यात अडीच वर्षांची असतानाच वडिलांचे छत्र हरविले. अर्चना ही घरात सर्वात लहान. दोन मोठय़ा बहिणी. आई ताई अढाव यांनी दोन मुलींचे लग्न करू न अर्चनाला शिकविण्याचा विडा उचलला. अर्चनाने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. पाचव्या वर्गात अस ताना अर्चना हनुमानप्रसाद शाह जनता विद्यालयात शिकायला लागली. याच शाळेतून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर अँ थलेटिक्स स्पर्धा गाजवू लागली. दरम्यान तिला राज्याच्या क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळाला. आणि येथूनच अर्चनाच्या क्रीडागुणांना खर्या अर्थाने वाव मिळू लागला.