तेल्हारा : महावितरणचे कनिष्ठ अभियंता आगरकर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:39 AM2018-03-06T01:39:47+5:302018-03-06T01:39:47+5:30
तेल्हारा : देयके वसुलीकडे दुर्लक्ष आणि कामाप्रती अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत महावितरणचे अकोटचे कार्यकारी अभियंता डॉ. प्रमोद काकडे यांनी तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर यांना निलंबित करण्याचे तसेच या केंद्रावरील सर्व कर्मचाºयांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : देयके वसुलीकडे दुर्लक्ष आणि कामाप्रती अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत महावितरणचे अकोटचे कार्यकारी अभियंता डॉ. प्रमोद काकडे यांनी तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर यांना निलंबित करण्याचे तसेच या केंद्रावरील सर्व कर्मचाºयांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे.
महावितरणच्या तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर सुमारे सहा महिन्यांपूर्वी कार्यालयात रुजू झाले होते. रुजू झाल्यापासून त्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. तसेच याचा परिणाम वीज देयकांच्या थकबाकीवरही होत होता. वरिष्ठांनी वारंवार ताकीद देऊनही कामकाजात सुधारणा न झाल्याने आगरकर यांना निलंबित करण्याचा आदेश डॉ. काकडे यांनी दिला आहे.
आगरकर यांना यापूर्वी वीज देयकाकडे दुर्लक्ष आणि जनतेच्या तक्रारींचे वेळेत निवारण न झाल्याने तसेच गैरशिस्त यासह इतर बाबीसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच वेतनाच्या एक तृतीयांश दंडाची शिक्षा का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागवण्यात आला होता. याविषयी समाधानकार उत्तर न मिळाल्याने अकोट येथील कार्यकारी अभियंता डॉ. काकडे यांनी आगरकर यांना निलंबित करण्याचा आदेश दिला. तसेच आगरकर यांच्या अधिनस्थ असलेल्या कर्मचाºयांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या आदेशामुळे कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. देयके वसुलीचा आता अधिकाºयांसह कर्मचाºयांनी धसका घेतला आहे.
महावितरणने सुरू केला कारवाईचा धडाका
महावितरणने देयके वसुलीसाठी दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी, अशा एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांच्याकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एक तृतीयांश रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्याचा आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे. महावितरणच्या कारवाईने अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.