तेल्हारा : हिवरखेड येथे जपल्या आहेत महात्मा गांधींच्या स्मृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:40 AM2018-01-30T01:40:37+5:302018-01-30T02:26:28+5:30
हिवरखेड : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने हिवरखेड येथे आजही जपल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर १९४८ साली त्यांचे अस्थिस्मारक हिवरखेड येथे उभारण्यात आले आहे. देशभरात नवी दिल्लीनंतर हिवरखेड येथे हे दुसरेच स्मारक आहे. स्मारकाला नवी दिल्ली येथील स्मारकासारखे बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
गोवर्धन गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने हिवरखेड येथे आजही जपल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर १९४८ साली त्यांचे अस्थिस्मारक हिवरखेड येथे उभारण्यात आले आहे. देशभरात नवी दिल्लीनंतर हिवरखेड येथे हे दुसरेच स्मारक आहे. स्मारकाला नवी दिल्ली येथील स्मारकासारखे बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
१९४८ मध्ये तत्कालीन मंत्री स्व. ब्रिजलाल बियाणी यांनी महात्मा गांधी यांच्या अस्थी चांदीच्या पेटीत हिवरखेड येथे आणल्या होत्या. त्यानंतर हिवरखेड येथील तत्कालीन आमदार संपतराव भोपळे यांनी सदाशिव संस्थान येथे त्या अस्थीचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले. तथापि स्मारकाचे काम रखडलेले आहे. पुढे २0१६ मध्ये लोकवर्गणीतून अस्थिस्मारकाचे काम सुरू करण्यात आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तत्कालीन एसडीओ शैलेश हिंगे यांनी या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले होते; परंतु शासनाकडून निधी मिळाला नाही. आता दिल्ली येथील राजघाटाच्या धर्तीवर हिवरखेड येथे महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून, शासनाकडून या अस्थिस्मारकाला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
नवीन पिढय़ांना राष्ट्रभक्तीची शिकवण
महात्मा गांधीच्या प्रथम पुण्यस्मरणाला ३0 जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन कलेक्टर डी.ए. व्हाईट यांच्या हस्ते अस्थी रक्षा स्मारकाची कोनशिला बसविण्यात आली होती. यावेळी हिवरखेडच्या राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्य सैनिकांसह परिसरातील जनता उपस्थित होती. आजही हे स्मारक स्वातंत्र्याच्या लढय़ातील हिवरखेडचं योगदान सांगत येणार्या पिढय़ांमध्ये राष्ट्रभक्ती पेटती ठेवत आहे.