कर्जमाफीसाठी तेल्हारा कडकडीत बंद

By admin | Published: June 5, 2017 07:09 PM2017-06-05T19:09:03+5:302017-06-05T19:28:46+5:30

विविध संघटनांनी दिला बंदला पाठिंबा; व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली प्रतिष्ठाने

Telhara shutdown for debt waiver | कर्जमाफीसाठी तेल्हारा कडकडीत बंद

कर्जमाफीसाठी तेल्हारा कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: येत्या खरीप हंगामापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी, याकरिता राज्यभर शेतकऱ्यांकडून संप सुरू असून, ५ जून रोजी तेल्हारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला तर विविध संघटनांनीसुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन आपला पाठिंबा दिला.
विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने बंदचे आवाहन ५ जून रोजी करण्यात आले होते. या बंदला तेल्हाऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना देण्यात आले. या निवेदनावर सूरज खारोडे, गजानन माझोडकर, विवेक खारोडे, अनंत विखे, नीलेश चव्हाण, रवी राऊत, प्रमोद गावंडे, चंद्रकांत मोरे, वैभव खाडे, ललीत पारसकर, दीपक अहेरकर, विठ्ठल खाडे, राहल गडम, निखिल खाडे, सचिन सपकाळ, पुरुषोत्तम तायडे, मुक्ता पारसकर, अमोल गडम, हरीश पाथ्रीकर, जयंत अहीर आदींची स्वाक्षरी आहे.

Web Title: Telhara shutdown for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.