तेल्हारा तालुक्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून अवैध सावकारीच्या ठिकाणी धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:19+5:302021-09-02T04:41:19+5:30
जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांच्याकडे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अवैध सावकारीच्या व्यवहारात बळकावल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार उपनिबंधक कहाळेकर यांच्या नेतृत्वात ...
जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांच्याकडे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अवैध सावकारीच्या व्यवहारात बळकावल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार उपनिबंधक कहाळेकर यांच्या नेतृत्वात सहा. निबंधक श्रीकांत खाडे यांनी आदेशित केलेल्या पथकाने शहरातील धनराज श्रीकृष्ण जामोदे (शिवाजी चौक, तेल्हारा) व ग्रामीण भागातील दिलीप वामनराव कंकाळे (रा. कार्ला, ता. तेल्हारा) यांच्या घरी पोलीस बंदोबस्तात धाडी टाकल्या. पथकाने महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेऊन पंचनामा केला. शहरात जिल्हा उपनिबंधक अकोला कार्यालयाच्या अधीक्षक अनिता भाकरे यांच्या नेतृत्वाखाली एस. पी. फुके, एम. आर. सोनूलकर, आर. एम. केंद्रे, जी. एम. कवळे यांच्या पथकाने, तर सहकार अधिकारी पी. आर. लाड यांच्या नेतृत्वाखाली जी. के. कुळकर्णी, जी. डी. चव्हाण, रश्मी पाकधुने यांच्या पथकाने कारवाई केली.