तेल्हारा : सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कृषी सहायकास जीवे मारण्याची धमकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:43 PM2017-12-18T22:43:32+5:302017-12-19T01:49:09+5:30
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले कृषी सहाय्याक एम. व्ही. सारभुकन यांना तळेगाव शेतशिवरातील पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रविवार, १७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात कृषी सहय्यकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी दोघा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले कृषी सहाय्याक एम. व्ही. सारभुकन यांना तळेगाव शेतशिवरातील पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रविवार, १७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात कृषी सहय्यकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी दोघा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी रविवारी तळेगाव बु. परिसरातील शेत शिवारात तलाठी व कोतवाल यांना सोबत घेऊन गेलेल्या कृषी सहयक सारभुकन यांच्यावर पुंडलीक लक्ष्मण तांबडे व राहुल पुंडलीक तांबडे या बापलेकांनी ज्वारी ऐवजी कपाशीचे क्षेत्र लिहिण्यासाठी तबावतंत्राचा वापर केला. हे करित असताना त्यांनी सारभुकन यांना अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात कृषी सहाय्यक सारभुकन यांनी दिलेल्या तक्रारीवरून, हिवरखेड पोलिसांनी रविवारी रात्री पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे या दोघांविरूद्ध भारतीय दंड विधान ३५३, ५0४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
शासकीय कामात व्यत्यय निर्माणा करणार्या तांबडे बाप-लेकांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी सारभुकन यांनी एका निवेदनाद्वारे तेल्हार्याचे नायब तहसीलदार सुरळकर यांच्याकडे केली आहे. तहसीलदारांना निवेदन सादर करताना त्यांच्यासमवेत वाय.डी. अरदवाड, पी.जी. राऊत, एस.पी. राजनकर, एन. डी. खराटे, प्रदीप तिवाले, पी. डब्ल्यू. पेठे, एस. आर. कोरडे, एल.आर. सरदार, एस.आर. कोहळे, एस.डी. ठोंबरे, एस. डी. निचळ यांच्यासह सर्व कृषी सहायक व तलाठी सुनील गिरी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी सदर घटनेचा निषेध केला असून, शेतकर्यांवर कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव बोंडअळी सर्वेक्षणाच्या कामावर बहिष्कार टाकावा लागेल, असा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. प्रतीउत्तरादाखल, तहसिलदारांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन देत कर्मचार्यांना सर्वेक्षण बंद न करण्याचे आदेश दिले आहेत.