तेल्हाऱ्यातील व्यापारी वाटमारीचा नव्हे हनीट्रॅपचा बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:29 AM2020-10-04T11:29:36+5:302020-10-04T11:30:47+5:30
HoneyTrap दोघींनी त्याला अडवत त्याच्या जवळील सोने आणि रोख मागितली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तेल्हारा येथील व्यापाºयाने दहीहांडा पोलीस ठाण्यात दिलेली वाटमारीची तक्रार बनावट असल्याचे समोर आले आहे. दोन युवतींच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर सोन्याचे दागीने युवतींनी पळविले. ते कृत्य झाकण्यासाठी व्यापाºयाने वाटमारीची बनावट तक्रार केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले आहे.
तेल्हारा येथील व्यापारी अजय वर्मा यांनी २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता गांधीग्रामवरून जात असताना चार अज्ञात इसमांनी मारहाण करून लुटल्याची तक्रार दहीहांडा पोलीस ठाण्यात दिली होती. व्यापाºयाने बदनामीच्या भीतीपोटी हनीट्रॅप लपवित गांधीग्रामजवळ लुटमार झाल्याची तक्रार दिली; मात्र स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत, हनीट्रॅपमधील दोन्ही युवतींना अटक केली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी वर्मा यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ (३४) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. अजय वर्मा यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत असतानाच ते चुकीची माहिती देऊन काही माहिती लपवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणातील मूळ मुद्याला हात घालताच वर्मा यांनी सत्य सांगण्यास सुरुवात केली. त्यानुसार तरुणीला भेटण्यासाठी वर्मा अकोल्यात आले होते. अकोट रोडवरील पाचमोरी येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या शेतात तरुणी व तिच्यासोबत आलेली एक महिला यांची वर्मा यांच्यासोबत गाठभेट झाली. त्यांच्यातील मधुर भेट आटोपल्यानंतर व्यापारी वर्मा तेल्हाºयाला जाण्यासाठी निघाला असता दोघींनी त्याला अडवत त्याच्या जवळील सोने आणि रोख मागितली. अन्यथा बलात्कार केल्याची तक्रार देण्याची धमकी दिली. दोन्ही महिलांच्या धमकीला घाबरून वर्माने अंगावरील १३ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख महिलांच्या स्वाधीन केले आणि तो घराकडे निघाला; मात्र या प्रकरणाचा भंडाफोड होईल या भीतीने त्याने चार अज्ञातांनी लुटल्याची बनावट तक्रार दिली; मात्र स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत अजय वर्मा यांच्या कबुलीजबाबवरून तरुणी व एका महिलेस अटक केली. दोन्ही महिला हनीट्रॅपमध्ये सराईत असून, लोकांना गंडविण्याचा त्यांचा व्यवसायच असल्याची माहिती आहे. दरम्यान अकरा वर्षांपूर्वी अकोल्यात गाजलेल्या सेक्स कँडलशी या युवतींचा संबंध असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारे लुटमार झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बदनामीच्या भीतीने बनावाट तक्रार
तेल्हारा येथील एका व्यापाºयाला हनीट्रॅपमध्ये ओढून त्यांच्यासोबत रात्र घालवल्यानंतर व्यापारी परत जाण्यासाठी निघाला असता या युवतीने बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत व्यापाºयाच्या अंगावरील सोने व चांदीचे दागिने पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.