तुम्ही सांगा महापौरपद कोणाला द्यायचे?

By admin | Published: March 4, 2017 02:33 AM2017-03-04T02:33:24+5:302017-03-04T02:33:24+5:30

भाजपच्या प्रदेश सरचिटणीसांनी घेतली नगरसेवकांची मते.

Tell me who is the Mayor? | तुम्ही सांगा महापौरपद कोणाला द्यायचे?

तुम्ही सांगा महापौरपद कोणाला द्यायचे?

Next

अकोला, दि. ३- पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून शहर विकासाला प्राधान्य देण्याचा दावा करणार्‍या भारतीय जनता पार्टीने महापौर पदाच्या निवडणुकीतदेखील पारदर्शकतेचा मुद्दा कायम असल्याचे शुक्रवारी दाखवून दिले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी ह्यतुम्हीच सांगा महापौरपद कोणाला द्यायचेह्ण, असा प्रश्न उपस्थित करून पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची मते विचारात घेतली.
राज्यातील दहापैकी आठ महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. अकोला महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला भरभरून मतांचे दान दिले. विकास कामांच्या बळावर भाजपचा सत्तेचा राजमार्ग मोकळा झाला असला, तरी पक्षाच्या अजेंड्यानुसार सत्ताधार्‍यांना पारदर्शक कामे करावीच लागतील, ही जबाबदारीसुद्धा ओघानेच आली आहे. येत्या ९ मार्च रोजी मनपामध्ये महापौर, उपमहापौरांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन्ही गटाने चालविली तयारी
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीपाठोपाठ महापालिके च्या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे भाजपचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावला आहे. पक्षांतर्गत दोन गट दिसत असले, तरी दोन्ही निवडणुकीच्या काळात प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख निभावल्याचे दिसून येते. मनपा निवडणुकीची सूत्रे धोत्रे गटाकडे होती. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही धोत्रे गटाचा दबदबा कायम राहील, असे चित्र आहे. धोत्रे गटाकडून विजय अग्रवाल, वैशाली शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे, तर दुसर्‍या गटाने हरीश आलिमचंदानी, आशिष पवित्रकार यांच्यासाठी तयारी सुरू केली आहे.

अग्रवाल, शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ?
महापौर पदाचा उमेदवार कोण असावा, यासाठी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची मते जाणून घेतली असली, तरी आजघडीला महापौर पदासाठी विजय अग्रवाल तर उपमहापौर पदासाठी वैशाली विलास शेळके यांचे पारडे जड मानल्या जात आहे.

Web Title: Tell me who is the Mayor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.