तापमान घटले; नागरिकांना दिलासा
By admin | Published: April 23, 2017 07:56 PM2017-04-23T19:56:25+5:302017-04-23T19:56:25+5:30
अकोला : गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरल्याने जिल्ह्याच्या तापमानात घट झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.
अकोला : गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरल्याने जिल्ह्याच्या तापमानात घट झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. होरपळून काढणाऱ्या उन्हाची दाहकता कमी झाल्याने नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गत आठवड्यात अकोल्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली होती. उष्णतेची ही लाट चार ते पाच दिवस सुरूच होती. सातत्याने वाढणाऱ्या तापमानाने नागरिकांच्या जीवाची काहिली झाली. गत रविवारी या मोसमातील आतापर्यंतच्या सर्वोच्च ४५.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. निम्मा आठवडा ४४ अंशांच्या वरच तापमान होते. शनिवारपासून मात्र तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. शनिवारी अकोल्यात ४१.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. रविवारी तापमानात किंचित घट होऊन ४०.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. आग ओकणाऱ्या सूर्याची प्रखरता कमी झाल्याने तापमान घटले आहे. परिणामी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आठवडाभरात ५ अंशांची घसरण
उष्णतेची लाट पसरल्याने गत आठवडा होरपळीचा ठरला. गत रविवारी अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. उष्णतेची लाट ओसरल्यामुळे तापमानातही घट होत असून, अकोल्यात रविवार, २३ एप्रिल रोजीचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. आठवडाभरातच पारा तब्बल ५ अंशाने घसरल्याने होरपळ कमी झाली आहे.