तापमानात होणार वाढ

By admin | Published: April 12, 2017 01:57 AM2017-04-12T01:57:54+5:302017-04-12T01:57:54+5:30

अकोला- येत्या १४ ते २० एप्रिलदरम्यान तापमानाचा पारा आणखी २ अंशाने वर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

The temperature will increase | तापमानात होणार वाढ

तापमानात होणार वाढ

Next

अकोला: तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून चाळीशी पार करीत असला तरी रात्री पारा कमलीचा घसरत असल्याने रात्री थंडी पडत असल्याचे चित्र दोन दिवसापासून आहे. येत्या १४ ते २० एप्रिलदरम्यान तापमानाचा पारा आणखी २ अंशाने वर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
अकोल्याचे तापमान एप्रिल-मे महिन्यात ४० अंश सेल्सीयस पर्यंत दरवर्षीच जाते; यावर्षी उन्हाळयाच्या प्रारंभीच तापमानाने चाळीशी गाठली मात्र दूपारी प्रखर उन्ह तर रात्री थंडी असाही अनुभव येत आहे. अचानक बदलत असलेल्या तापमानाबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संपर्क साधला असता, त्यांनी भारतीय हवामान खात्याचा हवाला देत असा प्रकार आणखी काही दिवस राहण्याची शक्यता व्यक्त केली.

Web Title: The temperature will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.