दहा गुंड अकोला जिल्ह्यातून तडीपार; ‘एसडीओं’ चा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:31 PM2019-08-17T12:31:33+5:302019-08-17T12:31:50+5:30

दहा गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी शुक्रवारी दिला.

Ten criminals send out of Akola district; 'SDO' order | दहा गुंड अकोला जिल्ह्यातून तडीपार; ‘एसडीओं’ चा आदेश

दहा गुंड अकोला जिल्ह्यातून तडीपार; ‘एसडीओं’ चा आदेश

Next

अकोला: आगामी धार्मिक सण व उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दहा गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी शुक्रवारी दिला. त्यामध्ये पाच गुंडांना सहा महिन्यांसाठी तर पाच गुंडांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले.
आगामी धार्मिक सण व उत्सवाच्या कालावधीत शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १० गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. त्यामध्ये अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत फैजलखान खलीलखान, सिव्हिल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत सतीश रघुनाथ वानखडे, रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत प्रेम ऊर्फ पिया श्याम खरे, खदान पोलीस ठाणे अंतर्गत प्रतीक घनश्याम खंडारे व रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत इसराईल इब्राहिम दिवाण इत्यादी पाच जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले.
तर डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत विक्की ऊर्फ शेख रुखसार शेख इद्रीस, एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत सचिन सुरेश गोखले, रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत बल्लू ऊर्फ बलबीर विजय पारोचे, सिटी कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत राजीक खान लतीफ खान व डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत लल्या ऊर्फ आतीष विजय इंगळे इत्यादी पाच जणांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिला. पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली.

 

Web Title: Ten criminals send out of Akola district; 'SDO' order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला