दहा दिवस उलटले; पण शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळी मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:09 PM2019-02-11T12:09:29+5:302019-02-11T12:09:35+5:30
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी पहिल्या हप्त्यात शासनामार्फत प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालयांना १ फेबु्रवारी रोजी वितरित करण्यात आला. दहा दिवसांचा कालावधी उलटून जात असला, तरी तहसील कार्यालयांकडून दुष्काळी मदतीचे वाटप अद्याप सुरू करण्यात आले नाही
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी पहिल्या हप्त्यात शासनामार्फत प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालयांना १ फेबु्रवारी रोजी वितरित करण्यात आला. दहा दिवसांचा कालावधी उलटून जात असला, तरी तहसील कार्यालयांकडून दुष्काळी मदतीचे वाटप अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी पहिल्या हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी ३१ जानेवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी १ फेबु्रवारी रोजी दिला. संबंधित तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करायची आहे; मात्र दहा दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, १० फेबु्रवारीपर्यंत तहसील कार्यालयांकडून दुष्काळी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यानुषंगाने मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँक खाते क्रमांकांची जुळवाजुळव सुरूच!
दुष्काळी मदतीची रक्कम उपलब्ध होऊन दहा दिवसांचा कालावधी पूर्ण होत असला, तरी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांचे बँक खाते क्रमांक गोळा करण्याचे काम तहसील कार्यालयांकडून अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे बँक खाते क्रमांकाची जुळवाजुळव करण्याचे काम पूर्ण केव्हा होणार आणि शेतकºयांच्या खात्यात प्रत्यक्षात दुष्काळी मदत केव्हा जमा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पाच तालुक्यांत असे आहेत दुष्काळग्रस्त शेतकरी!
तालुका कोरडवाहू बागायती
अकोला ६२७२७ ३००३
बार्शीटाकळी ३५५५३ ५०९३
तेल्हारा १४७०५ १२७८५
बाळापूर २०३०८ १९२०
मूर्तिजापूर ३८६८० ........
.............................................................................
एकूण १७१९७३ २२८०१
तालुकानिहाय असा वितरित करण्यात आला मदतनिधी!
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना पहिल्या हप्त्यात दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ४० कोटी ७७ लाख ७७ हजार २८० रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. त्यामध्ये अकोला तालुका -१० कोटी ७८ हजार १२३ रुपये, बार्शीटाकळी तालुका -६ कोटी ७१ लाख ९० हजार ८१९ रुपये, तेल्हारा तालुका -६ कोटी ३५ लाख ९८ हजार ३५७ रुपये, बाळापूर तालुका -८ कोटी ३० लाख ११ हजार २३४ रुपये व मूर्तिजापूर तालुक्यासाठी ८ कोटी ६१ लाख ७६ हजार ७४७ रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आला.
मदतीचे असे होणार वाटप!
प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपयेप्रमाणे मदत वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम म्हणजेच प्रतिहेक्टर ३ हजार ४०० रुपये पहिल्या हप्त्यात आणि तेवढीच रक्कम दुसºया हप्त्यात वाटप करण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांना प्रतिहेक्टर १८ हजार रुपये मदत वाटप करण्यात येणार असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये पहिल्या हप्त्यात व तेवढीच रक्कम दुसºया हप्त्यात वाटप करण्यात येणार आहे.
दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी शेतकºयांचे बँक खाते क्रमांक गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
-विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.