आणखी दहा बळी, ५०० नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:08+5:302021-04-28T04:20:08+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६१७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Ten more victims, 500 newly positive | आणखी दहा बळी, ५०० नव्याने पॉझिटिव्ह

आणखी दहा बळी, ५०० नव्याने पॉझिटिव्ह

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६१७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२८३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ३२, अकोट तालुक्यातील ५४, बाळापूर तालुक्यातील २१, तेल्हारा तालुक्यातील तीन, बार्शीटाकळी तालुक्यातील सहा, पातूर तालुक्यातील चार आणि अकोला-२१४ (अकोला ग्रामीण-२५, अकोला मनपा क्षेत्र-१८९) रुग्णांचा समावेश आहे.

येथील रुग्णांचा मृत्यू

पारस येथील ५१ वर्षीय महिला

विझोरा ता. बार्शीटाकळी येथील ४० वर्षीय पुरुष

गिरी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष

मलकापूर येथील ६७ वर्षीय पुरुष

बाळापूर येथील ४४ वर्षीय पुरुष

वाशिम बायपास येथील ४५ वर्षीय पुरुष

अकोट फैल येथील ६१ वर्षीय पुरुष

व्याळा ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष

हनुमान बस्ती येथील ६३ वर्षीय पुरुष

पातूर येथील ४० वर्षीय पुरुष

७५२ कोरोनामुक्त

दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, आरकेटी आयुर्वेदिक वेदिक महाविद्यालय येथील १०, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, केअर हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, यकीन हॉस्पिटल येथील तीन, बबन हॉस्पिटल मूर्तिजापूर येथील एक, खैर उम्मत हॉस्पिटल येथील एक, मुलांचे वसतिगृह येथील १९, कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पिटल येथील एक, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, देशमुख हॉस्पिटल येथील एक, ओझोन हॉस्पिटल येथील एक, पाटील हॉस्पिटल येथील एक, अथर्व हॉस्पिटल येथील एक, अवघाते हॉस्पिटल येथील तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पिटल येथील एक, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, तर होम आयसोलेशनमधील ६३० अशा एकूण ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५,३५३ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८,५४३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३२,५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Ten more victims, 500 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.