तणनाशक फवारणीकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:25+5:302021-07-14T04:22:25+5:30
--------------- प्रवासी निवारा उभारण्याची मागणी आगर : येथून जवळच असलेल्या नवथळ येथे प्रवासी निवारा नसल्याने, प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास ...
---------------
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
आगर : येथून जवळच असलेल्या नवथळ येथे प्रवासी निवारा नसल्याने, प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने प्रवासी निवारा उभारण्याची मागणी हाेत आहे.
-------------
सस्ती परिसरात विजेचा लपंडाव
खेट्री: गेल्या एका महिन्यापासून सस्ती परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभर विद्युत पुरवठा बंद राहत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हाेत आहे.
-----------------
दमदार पावसाने पिकांना संजीवनी
बाळापूर: मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील काही भागांत दमदार पाऊस पडला. त्यातच १० जुलै रोजी सायंकाळपासून, तर रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़.
--------------------
देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील देगाव-वाडेगाव रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
----------------
पाेकराचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करा!
बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवडलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचे डेस्कनुसार प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, असे आदेश कृषी विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.
----------
बाभूळगाव फाट्यावर गतिराेधक बसवा
पातूर: पातूर तालुक्यातील बाभूळगाव फाट्यावर गतिराेधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पातूर-बाळापूर या मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूक असते.