पोलीस वसाहतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:50 AM2017-09-12T00:50:00+5:302017-09-12T00:50:04+5:30
अकोला: अकोला येथील प्रस्तावित नवीन पोलीस वसाहतीतील तांत्रिक अडचणी दूर करून, तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला येथील प्रस्तावित नवीन पोलीस वसाहतीतील तांत्रिक अडचणी दूर करून, तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले.
बुलडाणा, अकोला व खामगाव येथील पोलीस वसाहतींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत डॉ. पाटील यांनी, खामगाव येथील १0४ पोलीस सदनिकांच्या वसाहतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावत, आवश्यक ती पूर्तता लवकर करण्याचे संबंधित अधिकार्यांना सांगितले.
तसेच बुलडाणा येथे पोलीस वसाहत, शहर पोलीस ठाणे आणि प्रशासकीय इमारत यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्याबाबत आढावा घेत पोलीस कर्मचारी वसाहतीच्या जुन्या बांधकाम प्रस्तावात वाढ सुचविण्यात आली असल्याने पोलीस ठाणे आणि प्रशासकीय इमारत निर्मितीच्या कामाला चालना देण्याचे सांगितले. तसेच अकोल्यातील प्रस्ताविक नवीन पोलीस वसाहतीच्या निर्माणातील तांत्रिका अडचणी दूर करून तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
यावेळी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
-