दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळावेत रेखाकला परीक्षेचे गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:46+5:302021-03-31T04:18:46+5:30
अकाेला : दहावीच्या विद्यार्थ्यांना काेराेनाचा फटका माेठ्या प्रमाणात बसला आहे. काेराेना संकटामुळे क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत त्यामुळे क्रीडाचे गुण ...
अकाेला : दहावीच्या विद्यार्थ्यांना काेराेनाचा फटका माेठ्या प्रमाणात बसला आहे. काेराेना संकटामुळे क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत त्यामुळे क्रीडाचे गुण यावर्षी मिळणार नाही हे स्पष्ट झाले असतानाच आता रेखाकला परीक्षेचेही गुण देण्यात कला संचालनालयाने नकार दिला आहे. दरम्यान, हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून, ज्यांनी चित्रकलेच्या दाेन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्यांना तरी गुण मिळावे, अशी मागणी कलाशिक्षकांकडून हाेत आहे . यावर्षी काेराेनामुळे शैक्षणिक सत्र झालेच नाही. सर्व अभ्यासक्रम ऑनलाइनच झाला असून, आता दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. या परीक्षा ऑफलाइन हाेणार असून, या परीक्षेत क्रीडा व रेखाकलेचे गुण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरतात, अशा स्थितीत आता या दाेन्ही विषयाचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने विद्यार्थीं तसेच शिक्षकांमध्ये राेष निर्माण झाला आहे.
काेट
ज्या विद्यार्थ्यांनी इंटमिजिएट आणि एलिमेंटरी या दाेन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत व ज्यांचे प्रमाणपत्र आलेले आहे अशा विद्यार्थ्यांना तरी दहावीच्या परीक्षेत गुण मिळाले पाहिजेत, त्यांनी परिश्रम घेतले परीक्षा दिली त्यांना गुण प्रदान न करणे हा अन्याय आहे.
संजय आगाशे, मुख्याध्यापक
काेट
कला संचालनालयाने यापूर्वी गुण देण्याकरिता सकारात्मकता दर्शवित पत्रक काढले, त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बाेर्डाकडे जमा केले आहेत. आता पुन्हा गुण मिळणार नाही, असे पत्रक आल्याची माहिती आहे. त्यामुळे हा गाेंधळ दूर करून विद्यार्थ्यांना गुण देणे आवश्यक आहे.
अमर देशमुख, कलाशिक्षक