दहावी पास सर्वांनाच मिळणार अकरावीत प्रवेश, सीईटीची वेबसाइट बंद, पण तयारी झाली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:07+5:302021-07-25T04:17:07+5:30
दहावी विद्यार्थी पास- २५,६३१ अकरावीसाठी एकूण जागा- १८,००० सीईटी वेबसाइट हँग सन २०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...
दहावी विद्यार्थी पास- २५,६३१
अकरावीसाठी एकूण जागा- १८,०००
सीईटी वेबसाइट हँग
सन २०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश प्रक्रिया (सीईटी) परीक्षा २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. दहावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने http//:cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा मंडळामार्फत २० जुलैपासून ते २६ जुलैपर्यंत उपलब्ध करून दिली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ तूर्त बंद करण्यात आले. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
सीईटी तयारी कशी कराल?
दहावीची परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नावर असते. परंतु सीईटी परीक्षा ही पर्यायी प्रश्नांवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासक्रमाची तयारी करावी. पर्यायी प्रश्नांची तयारी करावी. परीक्षेचा धसका घेऊ नये. कारण, ही अकरावी प्रवेशासाठी परीक्षा आहे. यापुढील सर्व परीक्षा पर्यायी प्रश्नांवर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा फायदाच होईल.
-प्रा. ललित काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ