दहावी, बारावीच्या ताेंडी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:14+5:302021-03-15T04:17:14+5:30

...................... स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप रखडले अकाेला : स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वाटप करण्यासाठी ई-पाॅस मशीनचा वापर करणे अनिवार्य ...

Tenth, Twelfth Taendi examination schedule announced | दहावी, बारावीच्या ताेंडी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावीच्या ताेंडी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Next

......................

स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप रखडले

अकाेला : स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वाटप करण्यासाठी ई-पाॅस मशीनचा वापर करणे अनिवार्य केला आहे, मात्र सध्या शहरामध्ये या मशीन आऊट आफ रेंज झाल्या असल्याने धान्यवाटपाचा डेटा भरणे शक्य हाेत नाही. त्यामुळे धान्य वाटप रखडल्याची माहिती महेश शर्मा यांनी दिली.

...........................

शिल्पा वानखडे यांचा सत्कार

अकाेला : एमआयडीसी पाेलीस स्टेशनच्या पाेलीस अंमलदार शिल्पा वानखडे यांचा पाेलीस निरीक्षक किशाेर वानखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साेनू राठाेड, नम्रता लाड, साेनाली मात्रे आदी उपस्थित हाेते.

............................

नीट परीक्षा १ ऑगस्टला

अकाेला : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली असून, परीक्षा १ ऑगस्टला घेण्याची नियाेजित केले आहे. याकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू हाेणार आहे.

.......................

तूर, हरभरा खरेदीला मान्यता

अकाेला : बार्शीटाकळी तालुक्यात तूर घाेटाळा झाल्यानंतर येथील मालाची खरेदी दाेन वर्षांपासून बंद हाेती ती आता सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे . येथील खरेदी-विक्री सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तूर घाेटाळा केला हाेता.

......................

दहावी, बारावी परीक्षांचा अभ्यासक्रम कमी करा

अकाेला : काेराेनामुळे दहावी व बारावीच्या परिक्षार्थींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या दाेन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम ५० टक्के कमी करावा अशी मागणी प्रहार संघटनेचे देवेश लाेखंडकार, श्रीकांत गावंडे यांनी पालकमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे

..........................

Web Title: Tenth, Twelfth Taendi examination schedule announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.