सर्वाधिक बळी घेणाऱ्या आजारांत श्वसन विकार तिसऱ्यां क्रमांकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:41 PM2018-11-20T18:41:17+5:302018-11-20T18:42:48+5:30

जगात सर्वाधिक मनुष्यहानी करणाºया आजारांमध्ये यापूर्वी सातव्या क्रमांकावर असलेले श्वसन विकार आता दुसºया क्रमांकावर आल्याची माहिती फुफ्फुस व श्वसन विकार तज्ज्ञ व दुर्बिन परिक्षक डॉ. अनिरुद्ध भांबूरकर यांनी दिली.

in term of most victim diesease Copd at third place! | सर्वाधिक बळी घेणाऱ्या आजारांत श्वसन विकार तिसऱ्यां क्रमांकावर!

सर्वाधिक बळी घेणाऱ्या आजारांत श्वसन विकार तिसऱ्यां क्रमांकावर!

Next
ठळक मुद्दे कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढल्याने त्याचा विपरित परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसºया बुधवारी ‘सीओपीडी’ दिन साजरा केला जातो. श्वसन नलिका लालसर व संवेदनशिल होते. वारंवार हा प्रकार सुरु राहिल्यास श्वसन नलिका अरुंद होते.


अकोला : आधूनिक जगात झपाट्याने वाढलेले औद्योगिकरीकरण, वाहनांची प्रचंड संख्या व कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढल्याने त्याचा विपरित परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे. हवेत आढळणाºया धूर, प्लास्टिक व इतर वस्तुंचे सुक्ष्म कण व प्रदूषणामुळे दमा व श्वसन विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी जगात सर्वाधिक मनुष्यहानी करणाºया आजारांमध्ये यापूर्वी सातव्या क्रमांकावर असलेले श्वसन विकार आता दुसºया क्रमांकावर आल्याची माहिती फुफ्फुस व श्वसन विकार तज्ज्ञ व दुर्बिन परिक्षक डॉ. अनिरुद्ध भांबूरकर जागतिक जीर्ण दमा अर्थात ‘सीओपीडी’ दिनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत यांनी दिली.
दमा व श्वसन विकारासंदर्भात जनजागृतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसºया बुधवारी ‘सीओपीडी’ दिन साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भांबूरकर म्हणाले, की वातारणातील प्रदूषणाचा सर्वाधिक वाईट परिणाम श्वसनयंत्रणेवर होतो. वातावरणातील धुळ,धूर, प्लास्टिक, सल्फेट नायट्रेट, कार्बन मोनॉक्साईड, ब्लॅक कार्बन यांच २.५ मायक्रॉन पेक्षा कमी आकाराचे कण श्वासोच्छवासाद्वारे श्वसन नलिकेत प्रवेश करतात व आतील नाजूक त्वचेला इजा पोहचवतात. यामुळे श्वसन नलिका लालसर व संवेदनशिल होते. वारंवार हा प्रकार सुरु राहिल्यास श्वसन नलिका अरुंद होते. यामुळे मनुष्याला श्वास घेण्यास त्रास होतो. यालाच क्रॉनिक ब्रॉन्कायटीस किंवा सीओपीडी म्हणतात, असे डॉ. भांबूरकर म्हणाले.

आहार व व्यायाम महत्वाचा
श्वसन विकारात संतुलित आहार व नियमित व्यायाम महत्वाची गुरुकिल्ली आहे. स्वच्छ हवेत फिरायला जाणे, नियमितपणे व्यायाम करणे व गरज भासल्यास औषधोपचार यामुळे सृदृढ व स्वस्थ जीवन जगता येते.

 

Web Title: in term of most victim diesease Copd at third place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.