परवाना नूतनीकरणासाठी कारखानदारांना ३१ पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 08:31 PM2017-10-12T20:31:36+5:302017-10-12T20:35:43+5:30

कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी  असलेल्या अकोलातील कारखानदारांना, २0१८ साठी परवाना  नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ऑनलाइन प्रणालीचा उपयोग  करून कारखानदारांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ही नोंदणी करावी,  असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अकोला विभागाचे  सहसंचालक र.वि. गिरी यांनी केले आहे.

Terminals up to 31 for renewal of license | परवाना नूतनीकरणासाठी कारखानदारांना ३१ पर्यंत मुदत

परवाना नूतनीकरणासाठी कारखानदारांना ३१ पर्यंत मुदत

Next
ठळक मुद्देऑनलाइन प्रणालीचा लाभ घ्यावा औद्योगिक सुरक्षेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी  असलेल्या अकोलातील कारखानदारांना, २0१८ साठी परवाना  नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ऑनलाइन प्रणालीचा उपयोग  करून कारखानदारांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ही नोंदणी करावी,  असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अकोला विभागाचे  सहसंचालक र.वि. गिरी यांनी केले आहे.
ऑनलाइन प्रणालीच्या दिलेल्या संकेतस्थळावर भोगवटादाराने  युजर आयडी तयार करून अद्ययावत माहिती, परवाना शुल्क  तसेच आवश्यक दस्ताऐवज अपलोड करून अर्ज करावा. उ परोक्त ऑनलाइन पद्धतीचा नमुना एक मध्ये माहिती भरून  झाल्यानंतर त्याचे प्रींट आउट  काढून त्यावर भोगवटादार व  व्यवस्थापक यांची स्वाक्षरी घेऊन पुन्हा अर्ज अपलोड करावा.  कारखाना व्यवस्थापनाकडून कोणत्याही कागदपत्रांच्या हार्ड कॉ पी घेण्यात येणार नाही. केवळ ऑनलाइन पद्धतीने प्राप्त  झालेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. ३१ ऑक्टोबरनंतर प्रा प्त होणार्‍या आवेदनावर अनुक्रमे नोव्हेंबर १७ पासून मार्च १८  पर्यंत  प्रतीमाह किमान ५ टक्केप्रमाणे शुल्क आकारल्या जाईल.  कारखान्याचे,  इमारतीचे  व संयंत्राचे नकाशे मंजुरीकरिता  ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर नकाशाच्या दोन प्रती स्पीड  पोस्टने किंवा कुरिअरने ट्रॅकिंग पद्धतीने कार्यालयास पाठविण्यात  याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Terminals up to 31 for renewal of license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.