मनपाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांची सेवा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:49+5:302021-06-26T04:14:49+5:30

केंद्र शासनाच्या अमृत अभियांतर्गत शहरात पाणीपुरवठा वितरणप्रणालीच्या कामांना २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली हाेती. ही याेजना लवकरात लवकर पूर्ण ...

Termination of service of Executive Engineer in charge of Corporation | मनपाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांची सेवा संपुष्टात

मनपाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांची सेवा संपुष्टात

Next

केंद्र शासनाच्या अमृत अभियांतर्गत शहरात पाणीपुरवठा वितरणप्रणालीच्या कामांना २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली हाेती. ही याेजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, या उद्देशातून मनपा प्रशासनाने २८ जून २०१८ मध्ये सेवानिवृत्त उपअभियंता एच. जी. ताठे यांची जलप्रदाय विभागात कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली हाेती. त्यानंतर त्यांना वेळाेवेळी मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, शासन निर्णयानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्ती देता येत नसल्यामुळे मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता ताठे यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला. तसे निर्देश त्यांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत. अधिनस्थ अभियंत्यांची कमतरता असतानादेखील ताठे यांनी जलप्रदाय विभागाचा कारभार तसेच अमृत अभियानाची कामे सुरळीत पार पाडल्याचे दिसून आले. तूर्तास मनपाच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंतापद, शहर अभियंता व आता जलप्रदाय विभागातील कार्यकारी अभियंतापद रिक्त असल्याने आयुक्तांसमाेर पेच निर्माण झाला आहे.

शहर अभियंतापदासाठी इच्छुक

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार अजय गुजर यांच्याकडे आहे. अत्यावश्यक सेवेचा समावेश असलेल्या जलप्रदाय विभागाची सूत्रे सांभाळण्यासाठी मनपात काेणीही सक्षम अधिकारी नाही. जलप्रदायच्या कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार स्वीकारण्यापेक्षा काही अधिकारी शहर अभियंतापदाचा प्रभार स्वीकारण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. यावर आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Termination of service of Executive Engineer in charge of Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.