तूर खरेदीसाठी शेतकर्यांवर अटींचा भडिमार; पणन विभागाकडून अद्यापही तारीख निश्चित नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 06:34 PM2018-01-18T18:34:16+5:302018-01-18T18:39:56+5:30
अकोला : शेतकर्यांची तूर खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने किमान आधारभूत दराने ‘एफएक्यू’ (फेअर अँव्हरेज कॉलिटी) दर्जाच्या तुरीची पणन महासंघाकडून खरेदी केली जाणार असली, तरी यासाठी शेतकर्यांवर अटींचा भडिमार करण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाच्या मापदंडानुसार योग्य प्रतीच्या मालाची खरेदी केली जाणार असली, तरी पणन महासंघाकडून अद्यापही तारीख निश्चित झाली नसल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

गतवर्षी राज्यात तूर खरेदीच्या मुद्यावरून शासनाच्या तूर खरेदी केंद्रांवर चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तूर खरेदीची हमी दिल्यामुळे शेतकर्यांनी तुरीचा पेरा वाढवला होता. यंदा हा गोंधळ टाळण्यासाठी पणन महासंघाकडून तूर खरेदी केली जाणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट केले जात असतानाच योग्य प्रतीच्या मालासाठी शेतकर्यांना विविध अटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले जात आहेत. यावर्षी केंद्र शासनाने तुरीची आधारभूत किंमत बोनससह ५ हजार ४५0 रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे. खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या मापदंडानुसार ‘एफएक्यू’ प्रतीचा माल आणणे बंधनकारक आहे. शिवाय, त्या मालाची चाळणी करून तसेच पूर्णत: वाळवून आणणे गरजेचे आहे. त्याचा ओलावा (आर्द्रता) १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसण्याची अट नमूद आहे. सद्यस्थितीत तूर उत्पादक क्षेत्रात तूर सोंगणीचा हंगाम सुरू आहे. तूर काढल्यानंतर ती वाळवत घालणे, नंतर चाळणी करणे व पुन्हा पोत्यात घालून खरेदी केंद्रावर पाठविण्यासाठी लागणार्या खर्चात वाढ होते. अशा तुरीची आद्र्रता निकषानुसारच राहील, याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत आहेत. पणन विभागाकडून पुढील आठवड्यानंतर तूर खरेदीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.
ऑनलाइन नोंदणी बंधनकारक
तूर विक्रीसाठी खरेदी केंद्र अथवा बाजार समितीमध्ये शेतकर्यांना ऑनलाइन नोंदणी क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सात-बाराचा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावी लागेल. त्यानंतर तुरीचा माल आणण्यासाठी तसेच खरेदीचा दिनांक व वेळेची माहिती ‘एसएमएस’द्वारे शेतकर्यांना दिली जाणार आहे.