काेराेना चाचणी करा; अन्यथा दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:23+5:302021-06-10T04:14:23+5:30
ग्राम पंचायत सचिवावर कारवाई करण्याची मागणी वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ग्राम पंचायत सचिवांनी ग्राम पंचायत सदस्यांची व ग्रामस्थांची ...
ग्राम पंचायत सचिवावर कारवाई करण्याची मागणी
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ग्राम पंचायत सचिवांनी ग्राम पंचायत सदस्यांची व ग्रामस्थांची दिशाभूल करून अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्यावर निलंबन करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायतीच्या सहा सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
आगर येथे अतिक्रमण, ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष
आगर: आगर गावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, काही भागांमध्ये अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा होत असून स्थानिक व बाहेरगावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावामधील आठवडा बाजारामध्ये मांस विक्रेत्यांसाठी मार्केट बांधून दिले आहे. तरी काही मांस विक्रेते रोडवरच अतिक्रमण करून मांस विक्री करतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. बाहेरगावातील महिला व मुलींची रोडने जाताना कुचंबणा होते. तसेच या परिसरात काही नागरिकही त्यांची वाहने रोडवर उभी करून ठेवतात.
पिंपळखुटा येथील नळ योजना बंद
पिंपळखुटा : येथील नळयोजनेच्या विहिरीवरील लाइनमध्ये कमी विद्युत दाब मिळत असल्यामुळे नळयोजनेची पाण्याची टाकी भरण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे काही दिवसांपासून नळ योजना बंद आहे. नळ योजनेच्या रोहित्राला विद्युत दाब कमी मिळत असल्यामुळे यावर ग्राम पंचायत प्रशासनाने महावितरणाचे सबस्टेशन सस्ती येथे निवेदनामार्फत नवीन रोहित्राची मागणी केली आहे.
गौण खनिज चोरीकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
बाळापूर : बाळापूर तालुक्यात गौण खनिज मुबलक प्रमाणात असल्याने मोठा महसूल मिळतो. परंतु गौण खनिजाची दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परंतु, महसूल विभागाकडून जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
जनुना ग्रामसेवकाची दांडी : विकासकामे ठप्प
निहिदा : बार्शीटाकळी पंचायत समितीअंतर्गत पिंजरजवळील ग्राम जनुना येथील ग्रामसेवक हजर राहत नसल्याने गाव विकासाला खोळंबा झाला आहे. गावात अस्वच्छता असून, बऱ्याच लोकांकडे शौचालय नाहीत. तसेच तेथील पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने तेथील ग्रामसेवकांच्या कामकाजावर रोष व्यक्त होत आहे.
नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती
वणी रंभापूर: दिवसेंदिवस वणी रंभापूर व आसपासच्या गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, गावातसुद्धा सर्दी, तापाचे रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांत वणी रंभापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.