प्रवाशांच्या संपर्कात आले तर चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:31+5:302020-12-31T04:19:31+5:30
‘मास्क वाटप’अभियानाचा प्रारंभ अकोला- कोविड १९ च्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी मास्क वापरणे हा एक प्रभावी उपाय आहे. या पार्श्वभूमीवर ...
‘मास्क वाटप’अभियानाचा प्रारंभ
अकोला- कोविड १९ च्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी मास्क वापरणे हा एक प्रभावी उपाय आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन रेडक्रॉस संस्थेच्या अकोला शाखेच्या वतीने मास्क वाटप हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. आज रेडक्रॉस या संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मास्क वाटप करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. किशोर मालोकार, ॲड. महेंद्र साहू, प्रभजितसिंह बछेर, राजाभाऊ देशमुख, अरुंधतीताई शिरसाट, ॲड. सुभाष मुंगी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण
अकोला - जिल्ह्याकरिता जानेवारी २०२१ करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य / नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे परिमाण निश्चित करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांनी कळविले आहे.