१२९९ जणांनी केली चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:44+5:302021-04-09T04:19:44+5:30
शहरात २१६ जण पाॅझिटिव्ह अकाेला : जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून महापालिकेला प्राप्त अहवालानुसार गुरुवारी शहरातील २१६ जणांना काेराेनाची लागण ...
शहरात २१६ जण पाॅझिटिव्ह
अकाेला : जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून महापालिकेला प्राप्त अहवालानुसार गुरुवारी शहरातील २१६ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झोन अंतर्गत ९६, पश्चिम झोन अंतर्गत २३, उत्तर झोन अंतर्गत ३८ आणि दक्षिण झोन अंतर्गत ५९ असे एकूण २१६ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
चाचणी करा, अन्यथा दुकानाला सील
अकोला : शहरातील व्यावसायिकांना दुकाने व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी अनिवार्य केली आहे. दुकान संचालक व दुकानांमधील सर्व कामगारांची काेराेना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल साेबत ठेवणे बंधनकारक आहे. अहवाल निगेटिव्ह नसल्यास किंवा चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानाला सील लावण्याचा इशारा गुरुवारी मनपाने दिला.
नियमांकडे नागरिकांची पाठ
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.
डासांची पैदास वाढली !
अकाेला : माेर्णा नदीपात्रात तुंबलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास वाढली असून, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या परिसरात फवारणी करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने मनपाकडे केली जात आहे. हिवताप विभागाने शहरातील काही भागात फवारणीला सुरुवात केली असून, नदीकाठ परिसरात फवारणीची मागणी हाेत आहे.