चाचण्यांचे प्रमाण ‘जैसे थे’: रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:08 AM2020-10-19T11:08:22+5:302020-10-19T11:08:39+5:30

Akola Coronavirus News रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला, मात्र चाचण्यांची संख्या कायम कायम आहे.

Tests 'as is': patient growth slows in Akola district | चाचण्यांचे प्रमाण ‘जैसे थे’: रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला

चाचण्यांचे प्रमाण ‘जैसे थे’: रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला

googlenewsNext

अकोला : मागील सहा महिन्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमी जास्त झाला, तर मागील दोन महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढल्याने सप्टेंबर महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक होती; मात्र ऑक्टोबरच्या मागील १७ दिवसात रुग्णसंख्या वाढीचा आलेख घसरल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येसोबतच वाढता मृत्यूदरही चिंतेचा विषय ठरत आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यानंतर चाचण्यांचे प्रमाण कमी होते; मात्र जून, जुलै महिन्यात आरटीपीसीआर सोबतच रॅपिड ॲन्टिजन चाचण्यादेखील करण्यात येऊ लागल्याने पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण वाढले. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने थैमान घातल्याने दररोज शंभरपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले. या महिन्यात सरासरी ४०० ते ५०० चाचण्या केल्या जात. ऑक्टोबर लागताच रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला, मात्र चाचण्यांची संख्या कायम कायम आहे.

तारीख - १ एप्रिल - १ मे - १ जून - १ जुलै - १ ऑगस्ट - १ सप्टेंबर - १ ऑक्टोबर

चाचण्या - ६२ - २३ - १०७ - २१२ - ५३२ - २५९ - ४०२

पॉझिटिव्ह - ०० - ०४ - २४ - १८ - २९            - २५            - ४४

५३२

सर्वाधिक चाचण्या १ ऑगस्ट रोजी

ॲन्टिजन - १९,९३२

स्वॅब - ४१,२११

 

कोरोनाचे एकूण रुग्ण - ८,०५१

उपचार घेऊन घरी परतलेले रुग्ण - ७,३०८

उपचार सुरू असलेले - ४७८

कोरोनाचे बळी २६५

Web Title: Tests 'as is': patient growth slows in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.