‘पीएम’ आवास योजनेच्या कार्यशाळेकडे लोकप्रतिनिधींची पाठ

By admin | Published: June 28, 2016 02:26 AM2016-06-28T02:26:28+5:302016-06-28T02:26:28+5:30

योजनेचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन.

Text of public representatives to 'PM' housing scheme workshop | ‘पीएम’ आवास योजनेच्या कार्यशाळेकडे लोकप्रतिनिधींची पाठ

‘पीएम’ आवास योजनेच्या कार्यशाळेकडे लोकप्रतिनिधींची पाठ

Next

अकोला: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांशी पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित कार्यशाळेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.
महापालिका क्षेत्रात ह्यपीएमह्णआवास योजनेंतर्गत ह्यसर्वांसाठी घरह्ण उपलब्ध करून देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा उद्देश आहे. योजनेची व्याप्ती मोठी आणि क्लिष्ट आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना माहिती व्हावी, सविस्तर चर्चा करता यावी या उद्देशातून महापालिका प्रशासनाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख, आ. गोपीकिशन बाजोरिया, आयुक्त अजय लहाने उपस्थित होते. झोपडपट्टीनिहाय प्रकल्प अहवाल तयार करून संपूर्ण शहराचा कृती आराखडा तयार करण्याचे काम ह्यशून्य कन्सलटेंटह्णकडे सोपविण्यात आल्यामुळे संबंधित कंपनीच्यावतीने उपस्थित नगरसेवकांना माहिती देण्यात आली.
महापौर उज्ज्वला देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम, माजी महापौर मदन भरगड, भारिप-बमसचे गटनेता गजानन गवई यांनी योजनेच्या संदर्भात माहिती विचारली. नगरसेवकांच्या प्रश्नांचे निरसन करून ह्यपीएमह्ण आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. पाटील यांनी केले. कार्यशाळेला लोकप्रतिनिधी व बहुतांश नगरसेवकांची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरला.

Web Title: Text of public representatives to 'PM' housing scheme workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.