बहिणीच्या घरी आलेल्या भावाची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या
By सचिन राऊत | Published: June 9, 2024 10:45 PM2024-06-09T22:45:54+5:302024-06-09T22:46:04+5:30
याप्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरू केला आहे.
अकोला : निमवाडी परिसरातील नव्यानेच झालेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरू केला आहे.
निमवाडी परिसरातील पाेलिस काॅलनी येथील रहिवासी महिला पाेलिस कर्मचारी यांच्या निवासस्थानी त्यांचा भाऊ अंकुश रामकृष्ण पळसपगार (वय ३२) हे शनिवारी मुक्कामासाठी आले हाेते. अंकुश हे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत हाेते. अज्ञात कारणावरून तणावात असल्याने त्यांनी शनिवारी रात्री उशिरा याच पाेलिस काॅलनीतील सातव्या मजल्यावर जाऊन खाली उडी घेतली. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मात्र, काहींनी अंकुश जिवंत असल्याची माहिती दिल्याने खदान पाेलिसांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, येथील डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरू केला आहे.