शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार शिक्षकच असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 12:12 PM2022-05-24T12:12:56+5:302022-05-24T12:15:26+5:30

The candidate for the teacher constituency should be a teacher : शिक्षक असलेल्याच व्यक्ती उमेदवारी करता यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

The candidate for the teacher constituency should be a teacher | शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार शिक्षकच असावा

शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार शिक्षकच असावा

Next
ठळक मुद्दे राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय आयोगाला पत्र अकाेल्याच्या खडक्कार यांचा पाठपुरावा

अकाेला : विधान परिषदेतील जागा भरताना अलीकडच्या काळात या जागांच्याा निर्मितीचा उद्देशच रसातळाला गेला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे ताे उद्देश सफल व्हावा या भावनेतून शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार शिक्षकच असावा या मागणीचा अकाेल्यातील प्रा. डाॅ. संजय खडक्कार यांनी सातत्याने पाठपुरवा केला, त्याची फलश्रृती म्हणून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेल्याच व्यक्ती उमेदवारी करता यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

राज्याच्या विधान परिषदेत सात शिक्षक मतदारसंघ आहेत. राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून हे सात आमदार निवडून दिले जातात. या निवडणुकीत त्या विभागातील माध्यमिक शिक्षक मतदानाद्वारे आपला आमदार निवडतात. सभागृहात शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या मांडणे अन् त्याची सोडवणूक करण्याची जबाबदारी या आमदारांवर असते. मात्र, राजकीय साेय म्हणून या मतदारासंघाचेही राजकीयकरण झाले आहे. या प्रकारामुळे या मतदारसंघाच्या निर्मितीमागचा हेतूच नष्ट हाेत असल्याने विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी गेल्या दोन वर्षांपासून सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करून शिक्षक मतदारसंघात शिक्षक उमेदवारच असावा ही मागणी लावून धरली. डॉ. खडक्कार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने या बदलाची शिफारस नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

 

राज्यात सात मतदारसंघ

राज्यात सध्या मुंबई, कोकण, पुणे, मराठवाडा, नागपूर, नाशिक आणि अमरावती असे सात शिक्षक मतदारसंघ आहेत.

 

राज्य निवडणूक आयाेगाने केंद्रीय आयाेगाला पत्र लिहिले असले तरी हा प्रश्न सुटलेला नाही; मात्र या निमित्ताने चर्चेला सुरुवात झाली हे उत्तम निवडणूक कायद्यात बदल केल्यावरच ही सुधारणा प्रत्यक्ष अमलात येऊ शकेल. यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक मंजूर केल्यानंंतर त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावरच या बदलाला कायद्याचं स्वरूप प्राप्त होईल. त्यामुळे हा लढा मी सुरूच ठेवणार आहे.

- प्रा. डॉ. संजय खडक्कार

Web Title: The candidate for the teacher constituency should be a teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.