कार्यशाळेत १००हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींचे झाले निरसन

By रवी दामोदर | Published: July 17, 2023 08:02 PM2023-07-17T20:02:39+5:302023-07-17T20:05:17+5:30

पीक विमा, पीक कर्ज संदर्भात आयोजित कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

The complaints of more than 100 farmers were resolved in the workshop | कार्यशाळेत १००हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींचे झाले निरसन

कार्यशाळेत १००हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींचे झाले निरसन

googlenewsNext

रवी दामोदर, अकोला: पीक विमा योजना, पीक कर्ज आदींबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोमवार, दि.१७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होेते. या कार्यशाळेला जिल्हाभरातून १०० हून अधिक शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. याप्रसंगी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संध्या करवा, एचडीएफसी विमा कंपनीचे प्रतिनिधी सुनील भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्र व पिकांसाठी शेतकऱ्यांना केवळ एक रूपया भरून नोंदणी करता येते, यासंदर्भात मार्गदर्शन करून पिकाचे नुकसान झाल्यास पूर्वसूचना कशी कळवावी, यासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच विमा योजना, कृषी योजना आदींबाबत कार्यशाळेत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनीही संवाद साधला.

‘त्या’ सीएससी सेंटरवर कडक कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने केवळ एक रुपयात विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरोरा यांनी केले. विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून जादा रक्कम घेणाऱ्या सामूहिक सेवा केंद्रांविरुद्ध (सीएससी सेंटर) कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला.

पीक विमा प्रचाररथाचा प्रारंभ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतक-यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने पीक विमा पाठशाळा घेण्यात आली. योजनेच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.

Web Title: The complaints of more than 100 farmers were resolved in the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला