जुना हिंगण्यात कोल्ह्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यासह चौघांना घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 10:54 AM2022-02-22T10:54:39+5:302022-02-22T10:57:07+5:30

The fox bite four people at Akola : कोल्ह्याने रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेलेल्या मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यासह आणखी दोघांनाही चावा घेतला.

The fox bite four people, including the farmer | जुना हिंगण्यात कोल्ह्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यासह चौघांना घेतला चावा

जुना हिंगण्यात कोल्ह्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यासह चौघांना घेतला चावा

Next
ठळक मुद्देमानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे जखमी जेरबंद केल्यानंतर सोडले जंगलात

अकोला : शेतात हरभरा पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना शहरालगतच्या जुना हिंगणा गावात सोमवारी सकाळी ८ वाजताचे सुमारास घडली. चवताळलेल्या या कोल्ह्याने रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेलेल्या मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यासह आणखी दोघांनाही चावा घेतला.

जुना हिंगणा येथील शेतकरी नाजूकराव घोरड हे सोमवारी सकाळी शेतात गेले असता, त्या ठिकाणी कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर गेले. त्यावेळी मोर्णा नदी पात्रात शांतपणे बसलेल्या कोल्ह्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता, कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला करून चावा घेतला. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी ओवे यांच्या मार्गदर्शनात वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक एस.एस. तायडे, एन.एम. मोरे, वन कर्मचारी गजानन म्हातारमारे, अनिल चौधरी, चालक यशपाल इंगोले यांनी घटनास्थळ गाठून कोल्ह्याला जेरबंद केले व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षित अधिवासात सोडून दिले. दरम्यान, जखमी शेतकरी नाजूकराव घोरड व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.

Web Title: The fox bite four people, including the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.