आकाश पर्वणी... सलग पाच दिवस दिसणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन
By Atul.jaiswal | Published: October 3, 2023 12:57 PM2023-10-03T12:57:33+5:302023-10-03T13:00:17+5:30
ही पर्वणी आकाश प्रेमींनी अवश्य अनुभवावी असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
अकोला : आपल्या पृथ्वीभोवती दरताशी सुमारे २७ हजार एवढ्या प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) हे बुधवार ४ ते रविवार ८ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
संपूर्ण जगात महागडी वस्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्र हा एकंदर १६ देशांनी एकत्रित केलेला प्रकल्प असून, त्याचा आकार फूटबॉलच्या मैदानापेक्षा मोठा आहे. सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर हे स्टेशन एका दिवसात पृथ्वीच्या १५ प्रदक्षिणा पूर्ण करते. जेव्हा ते आपल्या भागातून जाते त्यावेळी काही वेळापुरते ते चमकत्या फिरत्या चांदणी सारखे पाहता येते. बुधवारपासून सलग पाच दिवस या सरकत्या चांदणीचा अनोखा नजारा पाहता येणार असल्याने ही पर्वनी आकाश प्रेमींनी अवश्य अनुभवावी असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
असे होईल दर्शन
दिवस : कधी दिसणार : किती वेळ दिसणार
४ ऑक्टोबर : सायंकाळी ०७:०३ वाजता : दीड मिनिट
५ ऑक्टोबर : सायंकाळी ०७:५० वाजता : पावने दोन मिनिट
६ ऑक्टोबर : सायंकाळी ०७:०२ वाजता : साडेचार मिनिट
७ ऑक्टोबर : सायंकाळी ०७:५२ वाजता : पावने तीन मिनिट
८ ऑक्टोबर : सायंकाळी ०७:०३ वाजता : पावने सहा मिनिट